शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेवर ५०० बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:24 IST

महापालिका आयुक्तांची माहिती : १७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार

ठळक मुद्देमहापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईस प्रसूतिगृहात नव्याने ५० बेडची सुविधा करण्यात येणार जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासमवेत बुधवारी लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेची पाहणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडील पथक या जागेची पाहणी करेल

सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासनाचा लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेवर ५०० बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. जागेची पाहणी करण्यासाठी एक पथक शुक्रवारी सोलापुरात येत आहे, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी सांगितले.

कोरोना रोखण्यासाठी स्थापलेल्या शहर समितीची सभा गुरुवारी मनपाच्या कौन्सिल हॉलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी महापौर यन्नम होत्या. या बैठकीनंतर आयुक्त म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. गेल्या २० दिवसांत १६ हजार टेस्ट झाल्या आहेत.

टेस्ट करून घेण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नियोजन केले आहे. अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने ५०० बेडचे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासमवेत बुधवारी लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेची पाहणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयाकडील पथक उद्या या जागेची पाहणी करेल. 

बॉईस हॉस्पिटलही अत्याधुनिक होणारमहापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईस प्रसूतिगृहात नव्याने ५० बेडची सुविधा करण्यात येणार आहे. या ठिकाणी आॅक्सिजनचा पुरवठा होईल. बायपॅक मशीनही बसविण्यात येतील. या ठिकाणी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार होतील. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, एमआयएमचे रियाज खरादी यांनीही सूचना केल्या. मनपा कामगारांना दररोज सकाळचा नाश्ता द्यावा. त्यासाठी वर्षाचे मानधन देऊ, असे चंदनशिवे म्हणाले. किराणा दुकानदार, रिक्षाचालकांनी तातडीने अँटिजेन टेस्ट करून घ्यावी, असे खरादी म्हणाले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य