भाजीपाला क्रेटच्या आडून ४५ पोती गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:49+5:302021-09-02T04:48:49+5:30
यामुळे चोरून गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक शेरु नवाब पठाण (रा. रेल्वे स्टेशन, बीड) ...

भाजीपाला क्रेटच्या आडून ४५ पोती गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला
यामुळे चोरून गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक शेरु नवाब पठाण (रा. रेल्वे स्टेशन, बीड) व त्याचा सहकारी महमद असीफ काचलिया (रा. हासूर, औरंगाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना निपाणी येथून भाजीपाला, फळांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेटच्या आडून चोरुन गुटखा वाहतूक करणारा टेम्पो सांगोलामार्गे औरंगाबादकडे निघाल्याची खबर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सांगोला-कडलास रोडवर सांगोला महाविद्यालयासमोर (एमएच २० ईएल ५८४९) या टेम्पो चालकास इशारा करून थांबवले. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोच्या हौद्यात पाठीमागे क्रेट लावून आतील बाजूस ४५ पोती हिरा गुटखा झाकून ठेवल्याचे आढळून आले. अवस्थेत पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून लावला आहे.
याबाबत पोलिसांकडून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तुकाराम व्हरे, पोलीस नाईक आप्पासोा पवार, पोलीस नाईक राहुल देवकाते, पोलीस सिद्धनाथ शिंदे यांनी केली.
-----
०१सांगोला गुटखा१,२
सांगोला पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा पकडलेला टेम्पो व गुटख्याच्या पोत्याचे छायाचित्र.