ज्वारीची राखण करणा-याला टेम्पोने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:21 IST2021-02-14T04:21:22+5:302021-02-14T04:21:22+5:30

वैराग : रानडुकारांपासून ज्वारीची राखण करीत थांबलेल्या युवकाला टेम्पोने उडविले. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. ...

The tempo was blown away by the tidal guard | ज्वारीची राखण करणा-याला टेम्पोने उडविले

ज्वारीची राखण करणा-याला टेम्पोने उडविले

वैराग : रानडुकारांपासून ज्वारीची राखण करीत थांबलेल्या युवकाला टेम्पोने उडविले. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला.

शुभम गोवर्धन बनसोडे (वय २२, रा. हतीज, ता. बार्शी) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव असून हिंगणी-रातंजन रोडवर देशमुख यांच्या शेताजवळ रात्री पावणेदोनच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी वैराग पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हत्तीज येथील गोवर्धन बनसोडे यांचा मुलगा शुभम हा ज्वारीला पाणी देण्यासाठी गुरुवारी रात्रीला मित्र विकास कुंडलीक खुटे याच्याबरोबर दुचाकीवरून (एम.एच. २५, ए.ए. ७६८९) शेताकडे आला होता. पाणी देऊन झाल्यानंतर शेतात रानडुकरे येतात म्हणून ज्वारीची राखण करण्यासाठी मध्यरात्री तेथेच थांबला.

रात्री पावणे दोनच्या सुमारास हिंगणी आर. येथील रातंजन रोडवरून भरधाव वेगात निघालेला टेम्पो वेगात आला आणि थांबलेल्या शुभमला जोराची धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. याबाबत त्याचे वडील गोवर्धन बनसोडे यांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक विनय बहीर करीत आहेत.

----

फोटो : १३ शुभम बनसोडे

Web Title: The tempo was blown away by the tidal guard