वाळू वाहतूक करणारा टेम्पो, टमटम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:21 IST2021-05-16T04:21:28+5:302021-05-16T04:21:28+5:30
पोलीस नाईक धनंजय आवताडे, पोलीस नाईक नागेश निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी काळेल हे वाढेगाव हद्दीत पोलीस ...

वाळू वाहतूक करणारा टेम्पो, टमटम जप्त
पोलीस नाईक धनंजय आवताडे, पोलीस नाईक नागेश निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी काळेल हे वाढेगाव हद्दीत पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशानुसार पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सांडसमळा येथील माण नदीपात्रात काही लोक हे ४०७ टेम्पो व चारचाकी टमटम या वाहनातून चोरुन वाळू वाहतूक करत असल्याची बातमी मिळाली. त्या आधारे पोलीस तेथे गेले असता पोलिसांना पाहताच ते पळून गेले. पोलिसांनी एमएच १३/ बी ४८१७ टेम्पो व एमएच ०९/ इएम ३२६३ अशी ४ लाख २ हजार रूपयांची दोन वाहने जप्त केली. याबाबत पोलीस नाईक धनंजय आवताडे यांनी टेम्पो व टमटम चालक, मालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.
-----