टेम्पो- टिपरची धडक; चालक जागीच ठार; दुसरा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:21 IST2021-03-14T04:21:19+5:302021-03-14T04:21:19+5:30

हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये आयशर टेम्पो चालकाच्या बाजूस पलटी होऊन तो बाजूस असलेल्या दरवाजात ...

Tempo- tipper beating; The driver was killed on the spot; Another injured | टेम्पो- टिपरची धडक; चालक जागीच ठार; दुसरा जखमी

टेम्पो- टिपरची धडक; चालक जागीच ठार; दुसरा जखमी

हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये आयशर टेम्पो चालकाच्या बाजूस पलटी होऊन तो बाजूस असलेल्या दरवाजात अडकून चालक जागीच ठार झाला. दुसरा टिप्पर चालकही गंभीर जखमी आहे.

याबाबत टिपर चालक योगेश गौतम ढेरे याच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी की यातील मयत झालेला चालक हा लातूर येथून (एम.एच. ०४ जीआर.९०४३) या टेम्पोत लातूर येथून हरभऱ्याची पोती घेऊन बार्शीमार्गे कुर्डुवाडीकडे जात होता. त्यावेळी समोरून येणारा (एम.एच.११ ए.एल. ३६४१) या टिप्परची समोरासमोर जबर धडक दिली. यात टेम्पो पलटी झाला. या अपघातामुळे वाहतूक देखील ठप्प झाली होती. फौजदार युवराज सूर्यवंशी, पो.नाईक अभिजित शेटे, पोलीस राहुल बोदर , वैभव भांगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले.

फोटो

Web Title: Tempo- tipper beating; The driver was killed on the spot; Another injured