पंढपूरजवळ टेम्पो-ओम्नीचा भीषण अपघात, २ ठार
By Admin | Updated: April 23, 2016 10:01 IST2016-04-23T08:04:25+5:302016-04-23T10:01:47+5:30
पंढरपूर तालुक्यातील तुंगतजवळ टेम्पो व ओम्नी कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २ भाविक ठार तर तिघे जखमी झाले.

पंढपूरजवळ टेम्पो-ओम्नीचा भीषण अपघात, २ ठार
पंढरपूर, दि. २२ - पंढरपूर तालुक्यातील तुंगतजवळ टेम्पो व ओम्नी कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २ भाविक ठार तर तिघे जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरहून देवदर्शन करुन सोलापूरकडे निघालेल्या ओम्नी कारला समोरून येणा-या टेम्पोची जोरदार धडक बसली. त्यात ओम्नी कार फरफटत गेली आणि रस्त्याच्या कडेने चाललेल्या मोटारसायकलस्वारासही धक्का बसून मोठा अपघात झाला. यात ओम्नी कारमधील २ जण ठार झाले तर ३ जखमी झाले. निवृत्ती नारायण मरे (४०), शकुंतला अंगद पवार ( ४८, डोंबिवली) अशी मृतांची नावे आहेत. तर अंगद धोडीराम पवार (५४), अच्युत अंगद पवार (३५, दोघे रा. डोंबिवली, मुंबई) राजेंद्र रणदिवे (२५, तुंगत, पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत.