टेम्पोची काच फोडून सेन्साॅर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST2021-07-07T04:28:12+5:302021-07-07T04:28:12+5:30
सांगोला : टेम्पोच्या दरवाज्याची काच फोडून चोरट्यांनी २२ हजार रुपये किमतीचे सेन्साॅर चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी ७.३० च्या ...

टेम्पोची काच फोडून सेन्साॅर पळविले
सांगोला : टेम्पोच्या दरवाज्याची काच फोडून चोरट्यांनी २२ हजार रुपये किमतीचे सेन्साॅर चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास उघडकीस आली. सांगोला शहरातून अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोतील सेन्साॅर चोरीच्या घटना वाढल्याने वाहनमालक चांगलेच धास्तावले आहेत.
सांगोल्यात कर्मवीरनगर येथील इन्नुस अमिन नदाफ यांनी डाळिंबाचा व्यापार करण्याकरिता २०१७ मध्ये टेम्पो विकत घेतला होता. एक ते दीड वर्षापासून त्यांनी मित्र संदीप नंदकुमार चौगुले (रा. दत्तनगर, सांगोला) यास हा टेम्पो भाडेतत्त्वावर दिला होता. दरम्यान, शुक्रवारी (दि.२) रात्री १०च्या सुमारास संदीप चौगुले यांनी हा टेम्पो त्यांच्या घरासमोर लावला होता. दुसऱ्या दिवशी ३ जुलै रोजी सकाळी ७:३०च्या सुमारास संदीप चौगुले हा टेम्पो चालू करण्याकरिता वाहनाजवळ गेला असता उजव्या बाजूच्या दरवाज्याची काच फुटलेली दिसून आली.