दोन महिन्यांपासून मंगळवेढा पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST2021-03-21T04:21:54+5:302021-03-21T04:21:54+5:30
तालुक्यामध्ये ८० खेडी असून शहरालगत मोठी लोकसंख्या असणाऱ्या दोन ग्रामपंचायती आहेत. मात्र पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक बंद असल्यामुळे ...

दोन महिन्यांपासून मंगळवेढा पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद
तालुक्यामध्ये ८० खेडी असून शहरालगत मोठी लोकसंख्या असणाऱ्या दोन ग्रामपंचायती आहेत. मात्र पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक बंद असल्यामुळे नागरिकांना कोणतीच मदत रात्री-अपरात्री मिळत नाही. तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यामध्ये नंदेश्वर, बोराळे, लक्ष्मी दहिवडी आणि मंगळवेढा ग्रामीण व शहरी बीट आहेत. सध्या सर्व पोलीस कर्मचारी शहरामध्ये राहत आहेत.
शहरापासून ग्रामीण भागात जवळजवळ ४० ते ४५ किलोमीटर अंतरावर तालुक्यातील शेवटच्या टोकाची खेडी आहेत. मात्र दूरध्वनी क्रमांक सतत बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे अनेक नागरिकांना सोलापूर जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयाच्या फोनवर संपर्क करावा लागतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून रात्रीच्या वेळी विविध स्वरूपांच्या घटना घडत असतात. त्यामुळे मदत करणाऱ्याला व मदत मागणाऱ्याला कोणताच संपर्क होत नाही; त्यामुळे हा दूरध्वनी सुरू करावा, अशी मागणी होत आहे.