शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानामुळे मराठी चित्रपटातील उत्तम कलाकृतींची निर्मिती रसिकांसमोर येतेय : अलका कुबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 16:11 IST

संवाद; मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी 

ठळक मुद्दे- प्रसिध्द अभिनेत्री अलका कबुल सोलापूर दौºयावर-  ‘बकाल’ या सिनेमाच्या कलाकारांनी आज लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली- सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बकाल’ ची टीम सोलापुरात

सोलापूर : मराठी चित्रपट आता कोणत्याही चौकटीत अडकून राहत नाहीत. तमाशापट, विनोदी सिनेमांचा काळ गेल्यानंतर मराठी रजतपटावर वैविध्य दिसत आहे. नवनवीन विषय हाताळले जात  आहेत. शिवाय तंत्रज्ञानही विकसित झालेले आहे. त्यामुळेच उत्तमोत्तम कलाकृती चित्रपट रसिकांना पाहायला मिळत आहेत, असे निरीक्षण प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना येथे नोंदविले.

कुबल त्यांचे पती आणि दिग्दर्शक समीर आठल्ये तसेच ‘बकाल’ या अगामी सिनेमच्या कलाकारांनी आज लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या  अनेक वर्षांमधील देशभरातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थित्यंतरांचं प्रभावी दर्शन आपल्या मराठी चित्रपटामधून घडलं आहे. समाज जसजसा बदलत गेला, तसतसा आपला चित्रपटही बदलत गेला. लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय, तंत्रज्ञान या सर्वच आघाड्यांवर आजचं चित्रपट बदलांचं खरं क्रेडिट लेखक मंडळींनाच द्यायला हवं. आतापर्यंतच्या काळातला आणखी एक ठळक बदल म्हणजे चित्रपटाची लांबी. पूर्वीच्या सर्वसाधारण चित्रपटाची लांबी ही अडीच तास असे. अनेक चित्रपट हे अडीच ते तीन तासांचे असत. तसेच काहींची लांबी तर तीन तासांहूनही अधिक असे. सध्या चित्रपटाचे काम थ्रीडी लूक, न्यूक, फ्युजन, आफ्टर इफेक्ट्स यासारख्या सॉफ्टवेअरवरही  करण्यात येते.

पूर्वी चित्रीकरणादरम्यान अनेक रिटेक होण्याचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे निर्मात्यांचा पैसा वाचत आहे कारण प्रत्येक रिटेकला वेगळा खर्च करावा लागत होता, तो सध्या थांबला आहे. मराठी चित्रपट रसिकांना दमदार कथानकाची आवड आहे़ रसिकांच्या आवडीनुसार मागील काही वर्षांपासून दमदार चित्रपट रसिकांच्या भेटीला आले आहेत, असे त्या म्हणाल्या.यावेळी अभिनेता चैतन्य मेस्त्री, अभिनेत्री जुई बेंडखळे, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज आदी कलावंत उपस्थित होते. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरAlka Kubalअलका कुबलmarathiमराठी