शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

सोलापूर जिल्हा परिषदेमधील शिक्षकांनो सावधान;  ब्लेझर न घातल्यास सर्व्हिस बुकवर लाल शेरा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 19:51 IST

विरोध करणाºयांची डीई: तपासणीसाठी २८00 कर्मचाºयांची नियुक्ती

ठळक मुद्दे१९ नोव्हेंबर रोजी परिपाठाच्यावेळी सर्व शाळांची तपासणी करण्याची यंत्रणा तयारशुक्रवारी सर्व गट विकास व गट शिक्षण अधिकाºयांची कार्यशाळाप्रशासनाच्या निर्णयाला विरोध करणाºया शिक्षकांची डीई सुरू करण्याचे आदेश

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी १९ नोव्हेंबर रोजी शाळेवर आल्यावर परिपाठाच्यावेळी ब्लेझर न घातल्यास सर्व्हिस बुकवर लाल शेरा मारला जाणार आहे तर संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करणाºया शिक्षकांची डीई सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. 

दिवाळी सुटीनंतर १९ नोव्हेंबर रोजी झेडपी शाळांचा पहिला दिवस आहे. प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे या दिवशी सर्व शिक्षकांनी स्थानिक ड्रेसकोडबरोबर काळा ब्लेझर परिधान करणे बंधनकारक आहे.

ब्लेझरबाबत काहींनी विनाकारण गैरसमज पसरविला आहे.  ड्रेसकोडबाबत झेडपीच्या सभेने एकमताने निर्णय घेतला. त्यानंतर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे व पाच सभापतींनी १९ शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर १६ आॅक्टोबर रोजी या निर्णयाबाबत चर्चा केली. शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीच ब्लेझरचा विषय पुढे केल्याचे डॉ. भारूड यांनी स्पष्ट केले. ब्लेझरला संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठकीत सर्वानुमते मान्यता दिली. त्यानुसार प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. पण नंतर काहींनी ब्लेझरबाबत गैरसमज पसरवून विरोध सुरू केल्या आहे. ब्लेझर शाळेतील परिपाठ, राष्ट्रीय सण व बैठकांच्यावेळीच परिधान करायचा आहे. पूर्ण दिवसभरात गावकºयांना भेटताना शिक्षकांना ब्लेझर घालण्याची गरज नाही.

पहिल्या दिवशी होणार तपासणी१९ नोव्हेंबर रोजी परिपाठाच्यावेळी सर्व शाळांची तपासणी करण्याची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यासाठी २८00 कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी सर्व गट विकास व गट शिक्षण अधिकाºयांची कार्यशाळा होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTeacherशिक्षक