ब्रेन ट्युमरने त्रस्त गायत्रीस शिक्षकांनी दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:48+5:302021-07-02T04:15:48+5:30
कुमठे माध्यमिक प्रशालेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या गायत्रीला अनेक दिवसांपासून डोकेदुखी व अन्य व्याधीने ग्रासले होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला ...

ब्रेन ट्युमरने त्रस्त गायत्रीस शिक्षकांनी दिला मदतीचा हात
कुमठे माध्यमिक प्रशालेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या गायत्रीला अनेक दिवसांपासून डोकेदुखी व अन्य व्याधीने ग्रासले होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान केले. शस्त्रक्रिया हाच त्यावर पर्याय असल्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
या शस्त्रक्रियेसाठी ३ लाख खर्च अपेक्षित होता. घरची अत्यंत हलाखीची आर्थिक स्थिती, आई महादेवी कोरे यांची पायपीट सुरू होती. चार महिन्यांनंतर तिच्या प्रयत्नाला यश आले. कुमठे प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड, उपमुख्याध्यापक प्रकाश काशीद आणि पर्यवेक्षक मलकारी कोरे यांनी गायत्रीच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांशी संपर्क सुरू केला. सोलापुरातील गंगामाई हॉस्पिटलमध्ये तिच्यावर मोफत ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करण्याची तयारी डॉ. एस. प्रभाकर यांनी दर्शवली.
------
मदतीची गरज
गायत्रीच्या शस्त्रक्रियेचा खर्च मोठा आहे. शस्त्रक्रियेनंतर तिच्या वैद्यकीय देखभालीचा खर्चही कुटुंबीयांना पेलवणारा नाही. त्यामुळे आणखी आर्थिक मदतीची गरज आहे. गायत्रीच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत देण्याचे आवाहन आई महादेवी कोरे यांनी केले आहे.
--------
फोटो : २९ गायत्री कोरे
----