शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनावर सोलापूरातील शिक्षक संघटनेचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 13:06 IST

काळ्या फिती लावून काम करणार, अन्य शिक्षक संघटनांची सावध भूमिका

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या दोन्ही गटांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला अन्य शिक्षक संघटनांनी मात्र सावध भूमिका घेत या निर्णयापासून अलिप्त राहण्याचाच प्रयत्न केला

सोलापूर : ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या समारंभावर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या दोन्ही गटांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनाचे हे अस्त्र उपसले असले तरी अन्य शिक्षक संघटनांनी मात्र सावध भूमिका घेत या निर्णयापासून अलिप्त राहण्याचाच प्रयत्न केला आहे. यामुळे या आंदोलनात एकमेव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना उतरणार असल्याचे दिसत आहे.

मुख्याध्यापकांची पदोन्नती, चटोपाध्याय वेतन श्रेणी आणि पदवीधर शिक्षकांच्या मुद्यावर संघटनेने बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापकांची पदे शिक्षकांमधूनच भरली जातात. अशी १८९ पदे सोलापूर जिल्ह्यात रिक्त आहेत. चटोपाध्याय वेतन श्रेणीच्या लाभापासून शिक्षक वंचित आहेत. २३ आॅक्टोबर २०१७ पूर्वी सेवेला १२ वर्षे पूर्ण झालेले २८८ शिक्षक असून, २३ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानंतरचे सुमारे २५० शिक्षक आहेत. या सर्वांना चटोपाध्याय वेतन श्रेणी मिळण्याची मागणी आहे. पाचवी ते आठवीला शिकविणाºया २५० बी. एड. पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या मागण्यांसाठी यापूर्वी आंदोलने करूनही केवळ आश्वासने मिळाली. आमरण उपोषणानंतर अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिले. मात्र पूर्तता न झाल्याने शिक्षकदिनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे या दोन्ही संघटनांच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. या दिवशी काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेपुढे निदर्शने करण्याचे शिवाजीराव पाटील गटाने ठरविले आहे.जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचा आंदोलनात सहभागी होण्यासंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही. या संघटनेच्या जिल्हा शाखेच्या अध्यक्ष व सरचिटणीसांनी अलीकडेच आपले राजीनामे राज्य कार्यकारिणीकडे सोपविले आहेत. त्यामुळे बहिष्काराच्या भूमिकेसंदर्भात शिक्षक समितीची कसलीही भूमिका ठरलेली नाही. राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, असे अमोगसिद्ध कोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संघटनेचे दोन्ही गट आंदोलनात...- महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमध्ये राज्यस्तरावर दोन गट आहेत. जिल्ह्यातही दोन गट पडले आहेत. शिवाजीराव पाटील गटाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद भरले आणि संभाजीराव थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष एम. जे. मोरे या दोघांनीही या आंदोलनात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आंदोलनाची नोटीस दिली. 

पदवीधर संघटना दूर...- जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेची आंदोलनामागील भूमिका योग्य असली तरी वेळ चुकली, अशा शब्दात पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना व कें द्रप्रमुख संघटनेने टोला हाणला आहे. शिक्षक दिनाचा कार्यक्रम पूर्णत: शिक्षकांच्या सन्मानाचा असतानाही या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा संघटनेचा निर्णय चुकीचा आहे, अशा शब्दात अध्यक्ष राजाराम चव्हाण यांंनी या निर्णयाची भलावण केली. संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. मात्र या बहिष्कारात आपली संघटना सहभागी न होता कार्यक्रमात सहभागी होईल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाTeacherशिक्षक