शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

माणचे शिक्षक राज्याला करणार संगणक साक्षर

By admin | Updated: August 9, 2014 00:36 IST

सर्वत्र गाजणार ‘सातारा पॅटर्न’

म्हसवड : ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे आयोजित महाराष्ट्रातील निवडक प्राथमिक शिक्षकांना अध्यापनात संगणकाचा वापर कसा करावा, यासाठी आणि संगणकाचे ई-लर्निंगचे महाराष्ट्रभर प्रशिक्षण देण्यासाठी माण तालुक्यातील बालाजी जाधव आणि रामभाऊ सालगुडे या दोन प्राथमिक शिक्षकांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवसांची कार्यशाळेचे आयोजन केले असून, त्यामध्ये अध्यापनात संगणकाचा वापर कसा करावा, संगणकाच्या कोणत्या प्रणाली कोणत्या साईटचा वापर करावा, पेपरलेस वर्कसाठी शैक्षणिक बाबीचे महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक या दोघा शिक्षकांच्या साह्याने घेतले जाणार आहे.बालाजी जाधव व रामभाऊ सालगुडे या माण तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षकांनी कोणतीही संगणकाची पदवी अथवा कोर्स न घेता केवळ स्वत: जिद्दीच्या व इच्छा शक्तीच्या जोरावर संगणकाच्या दोन वेबवाईट स्वत: तयार केल्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांची मुंबई येथे राज्यस्तरावरील शैक्षणिक परिषदेसाठी निवड झाली होती. अफाट जिद्द व केवळ बौद्धिक वापरून काहीतरी नवीन आत्मसात करण्याच्या हेतूने, या दोन शिक्षकांनी वेबसाईट तयार करून माणच्या प्राथमिक शाळांमध्ये संगणक प्रणालीचे काम सुरू केले. सध्या सालगुडे-मार्डी केंद्रातील माळवाडी, वरकुटे, म्हसवड येथे कार्यरत असून, त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. सीआरसीमार्डी. ब्लॉगस्पॉट. कॉम या नावाने वेबसाईट तयार केली तर बालाजी जाधव यांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.सीआरसीम्हसवडएनओ ३. ब्लॉगस्पॉट. इन या नावाने वेबसाईट तयार केली.बालाजी जाधव या शिक्षकाने तर जिल्ह्यामध्ये प्रथमच म्हसवडसारख्या ग्रामीण भागात मागील वर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सचा प्रयोग यशस्वी केला होता. सध्या त्याच्या ब्लॉगवरून संपूर्ण महाराष्ट्राला मोफत शिष्यवृत्तीच्या आॅनलाईन टेस्टच्या माध्यमातून दररोज नवनवीन प्रश्नपत्रिका देऊन त्याचा निकालही क्षणार्धात पाहता येऊ लागला की, ज्याचे आज बाजारात बेसुमार पैसे मोजावे लागतात. दररोज १० नवनवीन प्रश्न अपडेट केले जातात. सर्व इयत्तावार महापाठ, स्वाध्याय उपलब्ध करून दिलेत. सर्व इयत्तांच्या कविता प्रश्नपेढ्या वाचनालय प्रयोगशाळा संचाची माहितीसह सर्व शैक्षणिक बाबींची माहिती या साईटवर आहे. रामभाऊ सालगुडे यांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.सीआरसीमार्डी. ब्लॉगस्पॉट. कॉम या साईटवर शासन निर्णय, शासनाची परिपत्रके, मान्यवरांचे लेख, शैक्षणिक क्लृप्त्या , शालेय पोषण आहार प्रणाली आदी विषयांची माहिती उपलब्ध आहे. याचा सर्वांनाच चांगला फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बालाजी जाधव व रामभाऊ सालगुडे हे दोन प्राथमिक शिक्षक सातारा जिल्ह्यातील पॅटर्न महाराष्ट्रभर सादर करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, वामनराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे.