शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

टाकी पाण्याची.. पार्टी मात्र दारुची; सोलापुरातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची सुरक्षितता वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 13:37 IST

सोलापुरातील टाक्यांची सुरक्षितता वाऱ्यावर :  अस्वच्छता अन्‌ धोकादायक सेल्फी पाॅइंटही !

दीपक दुपारगुडेसोलापूर :  शहराच्या चारही दिशांना असलेल्या उंचच उंच पाण्याच्या टाक्यांमधून प्रत्येक सोलापूरकराच्या घरामध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो...पण शहरवासीयांनो! तुमच्या ‘दृष्टीआड सृष्टी आहे’.. त्या मुळात सुरक्षित नाहीतच! तिथं टाकीवर कोणीही जाऊ शकतं. दारूच्या पार्ट्याही होतात. पाण्यात कोणी काही विषारी द्रव मिसळला तर त्याचा पत्ताही लागणार नाही...कारण या टाक्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणाच नाही...अगदी ‘आवो जावो घर तुम्हारा!’ अशीच स्थिती आहे.

‘लोकमत’च्या चमूने या टाक्यांची पाहणी केली. येथे सारंच थक्क करणारं होतं. कोणी विचारणाराच नसल्यामुळे तेथे अनेक ‘उद्योग’ चालतात. नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. एकतर चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो, त्यातही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जसा बेजबाबदारपणा दाखवतो तसाच या टाक्यांच्या सुरक्षेबाबतही आहे. हा विभाग  कमालीचा बेजबाबदार असल्याचे निदर्शनास आले.

अक्कलकोट रोड एमआयडीसी  सुरक्षारक्षक नाही, गेट, कंपाउंड नाही, टाकीखाली स्मार्ट सिटीच्या कामासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे, जनावरे बसण्यासाठी कायमची जागा, व्हॉल्व्ह मोकळे असून, त्यामध्ये कचरा आणि दारूच्या बाटल्या. शिवाय व्हाॅल्व्हमधून पाणी गळती होते. टाकीखाली मोकाट जनावरांचा मुक्त संचार.

होटगी रोड एमआयडीसी      येथे टाकीच्या बाजूला संरक्षक जाळी तोडून नागरिक सरळ टाकीवर जाऊन सेल्फी काढत होते, तर खाली मद्य पिण्यासाठी वापर केला जात होता. सुरक्षा रक्षक नसल्याने सहजासहजी टाकीवर प्रवेश करता येतो.

अक्कलकोट एमआयडीसीटाकीखाली झोन क्रमांक ३ चे कार्यालय आहे, संरक्षक जाळी, सुरक्षारक्षक नाही, कार्यालय बंद, टाकीच्या परिसरात गवत वाढलेले होते.अशोक चौक : गेंटालय चित्रपटगृहासमोरील टाकीखाली काही मद्यपी बसलेले, तर काही झोपलेले होते. परिसरात जनावरे होती. सुरक्षारक्षक नसल्याने कोणीही कधीही ये-जा करू शकतो.पोलीस आयुक्तालय : येथील पाण्याच्या टाकीजवळ चावीवाला दिसून आला. येथेच महानगरपालिकेचे कार्यालय असल्याने साफसफाई दिसून आली. मात्र, परिसरात विविध साहित्य ठेवण्यात आलेले दिसून आले.

अक्कलकोट रोड : टाकीखाली मद्यपींच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या, गेटचे दार सताड उघडे होते. टाकीखाली झोपण्यासाठी जागेचा वापर, परिसरात गवत आणि घाणीचे साम्राज्य होते. खाली ऑफिस असूनही कायम ते बंद असते.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका