शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

सोलापुरात चालत्या बाईकवर मोबाईलवर बोलणं ७२ जणांना पडलं महागात, सहा लाखांचा दंड वसूल

By विलास जळकोटकर | Published: March 02, 2024 6:59 PM

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त बसावी म्हणून वाहतूक पोलीस आक्रमक झाले आहेत.

सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त बसावी म्हणून वाहतूक पोलीस आक्रमक झाले आहेत. दररोज पाचेहून अधिक जणांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. शनिवारी ५२८ केसेस करुन त्यांच्याकडून ५ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, यामध्ये शानके साथ बाईक चालवताना ७२ जणांना महागात पडले. त्यांच्या खिशाला भुर्दंड पडला.

सोलापूर शहरात नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या आदेशान्वये अवैध कृत्य करणाऱ्यांसह शहरातील वाहतुकीची शिस्त बिघडवणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर धडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाहतूक शाखा झाडून कामाला लागली आहे. दररोज पाचशेहून अधिक केसेस दाखल होऊ लागल्या असून, शासकीय तिजोरीमध्ये लाखोंचा दंडही जमा होऊ लागला आहे. यामध्ये दंड महत्त्वाचा नसून, वाहनचालकांना शिस्त लागावी हा हेतू असल्याचे सांगण्यात आले.

शनिवारी राबवलेल्या मोहिमेत ट्रिपलसीट चालवणारे ५१, मोबाईलवर बोलणारे ७, विना गणवेष रिक्षाचालक २४, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे ६६, बुलेटला बेकायदेशीर सायलेन्सर वापरणारे ३०, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले ९०आणि इतर कलमान्वये १९५ अशा ५२८ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ५ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कारवाई सुरुच राहणारसदरची कारवाई ही यापुढेही चालू राहणार असून, शहरवासीयांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. दंड वेळेत भरावा तो पुन्हा नाही भरल्यास अधिक भुर्दंड बसू शकतो, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, धनाजी शिंगाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरtraffic policeवाहतूक पोलीस