लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले, सोलापूर एसीबीची कारवाई
By Admin | Updated: April 11, 2017 17:13 IST2017-04-11T17:13:19+5:302017-04-11T17:13:19+5:30
.

लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले, सोलापूर एसीबीची कारवाई
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११: आॅनलाइन ७/१२ उताराची दुरूस्ती करून नवीन उतारा देण्यासाठी २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना तुकाराम राजाराम अनभुले (वय ४५) या तलाठयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़
तुकाराम अनभुले हे शेवरे या गावी तलाठी म्हणून कार्यरत आहेत़ शेवरे येथील तक्रारदार यांचे शेवरे येथे गट नं ६३/३ आॅनलाइन ७/१२ उताराची दुरूस्ती करून ७/१२ उतारा देण्यासाठी तलाठी अनभुले यानी २ हजार ५०० रूपयाची मागणी केली होती़ मात्र तडजोडीअंती तक्रार शेतकऱ्यांकडून २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर पथकाने रंगेहाथ पकडले़ ही कारवाई उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या पथकाने केली़