‘परिचारकांवर कारवाई करा’
By Admin | Updated: February 21, 2017 03:56 IST2017-02-21T03:56:43+5:302017-02-21T03:56:43+5:30
भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी तमाम सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे जाहीर सभेत चारित्र्यहनन करुन

‘परिचारकांवर कारवाई करा’
सोलापूर : भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी तमाम सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे जाहीर सभेत चारित्र्यहनन करुन सैनिकांचा घोर अपमान केल्याबद्दल त्यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी केली़
परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे १७ फेब्रुवारी रोजी प्रचार सभेत सैनिकांचा अपमान होईल, असे बेताल व्यक्तव्य केले़ आजवर कोणीही अपमान केला नाही, असा घोर अपमान परिचारक यांनी केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)