शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

उपाययोजना करा़...अपघात रोखा; पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 16:58 IST

 पोलीस, ‘रस्ते विकास ’उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अपघातच्या स्थळांची पाहणी

ठळक मुद्देसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढलेली वाढलेली अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अपघात स्थळांची पाहणी अधिकाºयांनी या स्थळांना भेटी देऊन अडचणी जाणून घेतल्या

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढलेली आहे़ ही वाढलेली अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अपघात स्थळांची पाहणी करून तातडीने त्यावर उपाययोजना कराव्यात़ दरम्यान, जुना पुणे नाका, मडकी वस्ती, वारद फर्म या शहरालगतच्या क्षेत्रात रस्ते महामंडळाच्या वतीने अनेक कामे प्रलंबित आहेत ही कामे तातडीने महिनाभरात पूर्ण करून उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांनी दिल्या.

पुणे रोड मडकी वस्ती-वारद फार्म येथे वारंवार होणाºया अपघातावर प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त, रस्ते प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व बसपा गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यासह अन्य अधिकाºयांसमवेत पोलीस आयुक्तालयात बैठक झाली होती़ या बैठकीत अपघात स्थळाची पाहणी करण्याचे नियोजन ठरले होते, त्यानुसार गुरूवारी ४ वाजता संबंधित अधिकाºयांनी या स्थळांना भेटी देऊन अडचणी जाणून घेतल्या व त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी रस्ते विकास महामंडळाचे संजय कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे, सहा़ पोलीस आयुक्त डॉ़ दीपाली काळे, वैशाली शिंदे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, संजय जगताप, सहा़ पोलीस निरीक्षक ढाकणे, पोलीस निरीक्षक देशमाने, पोलीस कॉन्स्टेबल मस्के, प्रवीण भोसले, मनपाचे अधिकारी कांबळे, बेदरकार, गेजगे आदी उपस्थित होते.

नॅशनल हायवेच्या चुकीच्या धोरणामुळे मडकी वस्ती वारद फार्म येथे दोन महिन्यांमध्ये चौथा बळी गेला़ परवाच्या घटनेत शरणव्वा संगप्पा हुक्केरी ही महिला रस्ता पार करताना अपघात होऊन मरण पावली़ यावेळी बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते़ त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी गुरूवारी अपघातस्थळाची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या़ यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, ज्योती बमगोंडे आदी उपस्थित होते.

गतिरोधक करा...सर्व्हिस रस्ता खुला कराया अपघातस्थळाची पाहणी करताना संबंधित अधिकाºयांना सर्व्हिस रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे या रस्त्यावरून वाहने ये-जा करीत नसल्याचे पाहावयास मिळाले़ त्यामुळे पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांनी संबंधित विभागप्रमुखांना पुणे रोड मडकी वस्ती-वारद फार्म या परिसरात गतिरोधक करा, सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमणे काढून वाहतुकीसाठी रस्ता खुला करा आदी सूचना दिल्या़ 

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाRto officeआरटीओ ऑफीस