शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

मराठा विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच फी घ्या; सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूचे महाविद्यालयांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:38 IST

सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलनाला मिळाले यश

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांकडून ५० टक्के फी घेतली जाईल - कुलगुरूज्या विद्यार्थ्यांची फी १०० टक्के घेतली आहे त्यांना तत्काळ ५० टक्के परत करावी - कुलगुरू

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाशी संलग्न ज्या महाविद्यालयांनी मराठा समाजासह आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची फी १०० टक्के घेतली आहे त्यांनी तत्काळ ५० टक्के फी विद्यार्थ्यांना परत करावी, असे आदेश सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिले. तसेच  यापुढे सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांकडून ५० टक्केच फी घेतली जाईल,  जे महाविद्यालय आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन  त्यांनी मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांना दिले. 

शहर व जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच फी घेण्याचे आदेश करण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.  कुलगुरूंच्या वरील आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के फी आकारण्यात यावी, असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे. शासन आदेश असतानाही याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून १०० टक्के फी घेतली जात होती.

सकल मराठा समाजाच्या वतीने या विषयावर आवाज उठविला होता. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांना आदेश देण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना आतमध्ये बोलावून घेतले. मागणी ऐकून घेऊन सविस्तर चर्चा केली आणि तत्काळ त्यांनी संबंधित सर्व कॉलेजना आदेश दिले व ज्या विद्यार्थ्यांची फी १०० टक्के घेतली आहे त्यांना तत्काळ ५० टक्के परत करावी, असा आदेश दिला.

सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांकडून ५० टक्के फी घेतली जाईल, याची काळजी घेऊ. जे महाविद्यालय आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांनी आभार मानले.यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पावर, रवी मोहिते, नगरसेवक विनोद भोसले, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी कार्याध्यक्ष सुहास कदम, जिल्हाध्यक्ष सोमा राऊत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फी घेतल्यास कारवाईच्शासनाचे आदेश असतानाही बहुतांश शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये हे जाणीवपूर्वक आर्थिक दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांकडून १०० टक्के फी घेत आहेत. असा प्रकार घडत असेल तर संबंधित विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. फी घेणाºया महाविद्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी दिला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी