ताडसौंदणे शेडमध्ये बांधली म्हैस अन् रेडकू पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:53+5:302021-07-11T04:16:53+5:30
बार्शी : शहरातील ताडसौदणे रस्त्यावर गायकवाड प्लॉट येथील वीटभट्टीवर शेडमध्ये बांधून ठेवलेली ८० हजार रुपयांची ...

ताडसौंदणे शेडमध्ये बांधली म्हैस अन् रेडकू पळवले
बार्शी : शहरातील ताडसौदणे रस्त्यावर गायकवाड प्लॉट येथील वीटभट्टीवर शेडमध्ये बांधून ठेवलेली ८० हजार रुपयांची एक म्हैस व तिचे रेडकू चोरट्यांनी पळवून नेले. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली.
म्हशीचे मालक गणेश दीपक ताकपिरे (वय २४, रा. ताडसौंदने रोड) यांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांकडील मिळालेल्या माहितीनुसार गणेश ताकपिरे यांची ताडसौंदणे रस्त्यावर वीटभट्टी आहे. तिथे जनावरे दिवसभर चरण्यासाठी सोडून रात्री पत्र्याच्या शेडमध्ये म्हैस व रेडकू यांना सायंकाळी बांधले होते. सकाळी नेहमीप्रमाणे धारा काढण्यासाठी गेल्यानंतर बांधून ठेवलेल्या ठिकाणी ही जनावरे दिसली नाहीत.