टेबल टेनिस स्पर्धेत
By Admin | Updated: December 3, 2014 00:47 IST2014-12-03T00:47:02+5:302014-12-03T00:47:02+5:30
सारंग गव्हाणे विजयी

टेबल टेनिस स्पर्धेत
बार्शी : येथील शालेय टेबल टेनिस स्पर्धेत सारंग प्रशांत गव्हाणे याने विजेतेपद पटकाविले.
सारंग हा येथील श्रीमती प्रयागबाई कराड विश्वशांती इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. त्याने प्रतिस्पर्धी हर्षवर्धन शहा याचा २१-१५, ९-२१, २१-१७ अशा सेटमध्ये पराभव केला. त्याला प्राचार्य विष्णू मगदूम, क्रीडाशिक्षक अरुण शिंदे यांचे मार्गदर्शन, तर प्रशांत गव्हाणे, संतोष गव्हाणे यांचे प्रोत्साहन लाभले.