शिपायाला आरोग्यसेवक पदावर बसविणाऱ्या ग्रामसेवकावरही कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:34+5:302021-08-21T04:26:34+5:30
माढा तालुक्यातील नाडी-लोणी ग्रामपंचायत गेल्या दोन तीन महिन्यांपासून शिपाई संतोष खंडागळे याने केलेल्या करारनाम्यामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत हा विषय ...

शिपायाला आरोग्यसेवक पदावर बसविणाऱ्या ग्रामसेवकावरही कारवाईची टांगती तलवार
माढा तालुक्यातील नाडी-लोणी ग्रामपंचायत गेल्या दोन तीन महिन्यांपासून शिपाई संतोष खंडागळे याने केलेल्या करारनाम्यामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत हा विषय अधिक चर्चेला आला आहे. त्यामुळे खंडागळे यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सीईओच्या दालनात गेला आहे. त्यावर त्यांची सही झाल्यानंतर तो प्रस्ताव पुणे येथील आयुक्तांकडे सादर होणार आहे. तोपर्यंत त्याला ज्यांनी साथ दिली, त्या ग्रामसेवकाचीही चौकशी सुरू असून, आतापर्यंत दप्तर तपासणी झाली आहे. त्याच्यावरही विविध विषयांवरून ठपका ठेवल्याचा अहवाल माढा बीडीओकडे सादर झाला. यावर म्हणणे मांडण्यासाठी संबंधित ग्रामसेवकाला बीडीओने नोटीस दिली आहे. त्याचे म्हणणे घेऊन अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. आहे. त्या शिपायाला साथ देणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई होण्यासाठी तक्रारकर्ते ग्रा.पं. सदस्य धम्मपाल दणाणे यांचा झेडपीकडे पाठपुरावा सुरू आहे.
------
लोणी-नाडी ग्रामपंचायतीमधील त्या तत्कालीन शिपायाचा व विद्यमान आरोग्यसेवकाचा कारवाई अहवाल झेडपीकडे सादर केला आहे. त्याचबरोबर, संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाच्या दप्तराची तपासणी पूर्ण झाली आहे. आता याबाबत त्याचे म्हणणेही मागविण्यात आले आहे. ते आल्यानंतर दोन्ही अहवाल लवकरच पुढील कार्यवाहीसाठी झेडपीकडे पाठविण्यात येईल.
- प्रताप पाटील, सहायक गटविकास अधिकारी, माढा.
------