शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

प्रेयसीनं दुसरीकडं सूत जुळवलं, सहन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:23 AM

करमाळा : प्रेयसीचे अनैतिक संबंध दुसरीकडे जुळल्याने चिडून अपघाताचा बनाव रचला खरा, पण पिकअपच्या फुटलेल्या हेडलाइटमुळे अंगलट आला. रविवारी ...

करमाळा : प्रेयसीचे अनैतिक संबंध दुसरीकडे जुळल्याने चिडून अपघाताचा बनाव रचला खरा, पण पिकअपच्या फुटलेल्या हेडलाइटमुळे अंगलट आला. रविवारी पहाटे वडशिवणे येथे झालेल्या अपघाताचा बनाव पोलिसांनी चोवीस तासांत उघड केला. विजय काकडेच्या खूनप्रकरणी संशयित अक्षय उत्तरेश्वर ढावरे यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रविवारी पहाटे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला वडशिवणे येथील शाळेचे शिपाई विजय काकडे (वय ४८) गेले होते. पाचच्या सुमारास एका अनोळखी वाहनाने स्मशानभूमीजवळ त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला व विजय काकडेचा अपघात नसून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयित आरोपी अक्षय ढावरे हा वडशिवणे गावातील सोमनाथ मगर यांच्या (एमएच ४५ टी ९७२२) या पिकअपवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे एका विवाहितेशी सूत जुळले. काही दिवसांनंतर तिने अक्षयकडे दुर्लक्ष करून विजय काकडे याच्याशी सूत जुळवले. हा राग मनात ठेवून विजयचा काटा काढण्याचे ठरवले व विजय मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर अपघात घडवून आणला.

---

हेडलाइट फुटल्याने खुनी पोलिसांच्या जाळ्यात...

रविवारी पहाटे विजय काकडे मॉर्निंग वॉकला गेला असता त्याच्या अंगावर पिकअप घातली. त्यात विजयच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. पण या धडकेत पिकअपचे समोरील हेडलाइट फुटून घटनास्थळी पडले. फौजदार दिलीप तळपे, नितीन चव्हाण, सागर शेंडगे यांनी तपास करीत असताना आढळून आलेल्या पिकअपची हेडलाइट फुटलेली दिसली. त्यावरून पिकअपच्या मालकाकडे चौकशी केल्यानंतर पिकअप अक्षय ढावरेकडे असल्याची माहिती मिळाली अन्‌ संशयित पकडला गेला.

----

फोटो : मयत विजय काकडे