नारीच्या सरपंचपदी स्वाती रानमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST2021-03-04T04:40:23+5:302021-03-04T04:40:23+5:30

बार्शी : नारी (ता. बार्शी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या स्वाती अमोल रानमाळ तर उपसरपंचपदी नामदेव वाघ ...

Swati Ranmal as Sarpanch of Nari | नारीच्या सरपंचपदी स्वाती रानमाळ

नारीच्या सरपंचपदी स्वाती रानमाळ

बार्शी : नारी (ता. बार्शी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या स्वाती अमोल रानमाळ तर उपसरपंचपदी नामदेव वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नारी येथील लढत अटीतटीत पार पडली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत ११ पैकी ८ सदस्य निवडून येऊन राऊत गटाने बाजी मारली होती. या निवडणुकीत राऊत गटातून तरुण उमेदवारांना सर्वाधिक संधी दिली गेली होती. सरपंच निवडणुकीत स्वाती अमोल रानमाळ तर उपसरपंचपदी नामदेव वाघ यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय दाभाडे यांची निवड करण्यात आली.

यावेळी केशव घोगरे, संतोष पाटील, दादा कदम, रामचंद्र माळी, अनिल रानमाळ, वैजीनाथ शिंदे, काकासाहेब पाटील, राकेश पाटील, बिभीषण कदम, विश्वास शिंदे, पोलीस पाटील, वैभव माळी उपस्थित होते.

निवडून आलेल्या सर्व पदाधिका-यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे.आर. धनुरे यांनी काम पाहिले.

----

२८ नारी

नारीच्या सरपंचपदी निवड झाल्यांतर सरपंच स्वाती रानमाळ आणि आणि नामदेव वाघ यांचा सत्कार करताना नागरिक.

Web Title: Swati Ranmal as Sarpanch of Nari