माझ्या वाटचालीत स्वामी समर्थांचे योगदान मोलाचे : धवलसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:21+5:302021-02-05T06:47:21+5:30

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत ते होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने ...

Swami Samarth's contribution in my journey is invaluable: Dhawal Singh | माझ्या वाटचालीत स्वामी समर्थांचे योगदान मोलाचे : धवलसिंह

माझ्या वाटचालीत स्वामी समर्थांचे योगदान मोलाचे : धवलसिंह

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत ते होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांची कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीसह अकलूज ग्रामपंचायत सदस्य मयूर माने, जनसेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पालकर, जनसेवा संघटनेचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष नितीन मोरे, सरचिटणीस सुधीर रास्ते, ग्रामपंचायत सदस्य सागर कांबळे, जिल्हाध्यक्ष रोजगार आघाडीचे प्रवीण सोनकांबळे, धनाजी कांबळे, सोलापूर शहर जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अविराज शिंदे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, अविनाश क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, महादेव तेली, विपुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो ओळ ०१ अक्कलकोट-धवलसिंह

धवलसिंह मोहिते-पाटील यांचा वटवृक्ष देऊन मंदिरात सत्कार करताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Web Title: Swami Samarth's contribution in my journey is invaluable: Dhawal Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.