झेडपी आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे स्वामी, जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:59+5:302021-07-10T04:15:59+5:30

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य अध्यक्ष शिवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली २०१५ पासून ...

Swami, Jadhav felicitated by ZP health workers | झेडपी आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे स्वामी, जाधव यांचा सत्कार

झेडपी आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे स्वामी, जाधव यांचा सत्कार

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य अध्यक्ष शिवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली २०१५ पासून संघर्ष करत होते. याबाबत संघटनेतर्फे वेळोवेळी पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी यांना निवेदने दिली होती.

प्रलंबित विषय मार्गी लागल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे, झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती दिलीप चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष उमेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, अविनाश गोडसे, प्रशासन अधिकारी जगताप यांचे आभार मानले.

यावेळी राज्य अध्यक्ष शिवराज जाधव, जिल्हाध्यक्ष मिलिंद गणपुले, जिल्हा सरचिटणीस सी. टी. पवार, गोपाळ शिंदे, गणेश शिंदे, कार्यकारी अध्यक्ष शिवाजी कांबळे, कोषाध्यक्ष बाबा काळजे, प्रमोद जावळे, प्रकाश बिराजदार, फिरोज शेख, पिंटू सोनटक्के, महिबूब निटोरे, त्रिमूर्ती राऊत, रामलिंगया स्वामी उपस्थित होते.

फोटो :::::::::::::::::::

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर.

Web Title: Swami, Jadhav felicitated by ZP health workers