शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

अक्कलकोटच्या स्वामी भक्तांना ऑनलाइनवर मोफत महाप्रसाद बुकिंग करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 09:26 IST

कोरोनामुळे मंदिर समितीने घेतला निर्णय; भाविकांच्या वेळेत बचत होणार

चपळगाव : सध्या जगात सर्वत्र चालू असलेल्या कोरोना महामारीमुळे आणि स्वामीभक्तांच्या वाढती गर्दी पाहता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादास येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांसाठी मोफत ऑनलाईन महाप्रसाद बुकिंगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली. ही व्यवस्था संपूर्णतः मोफत असून त्याचा लाभ सर्व स्वामी भक्त घेऊ शकणार आहेत.

न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी माहिती देताना सांगितले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सन १९८८ पासून अक्कलकोटात येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाची सोय केली जाते. दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढतच चालला आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीला सुरू केलेल्या अन्नछत्राचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले. भक्तांच्या सोयीसाठी रांगेतून नियोजन सुरू झाले आणि प्रत्येक पंगत संपून पुढची पंगत सुरू होईपर्यंत भक्तांना उभे राहावे लागते.ह्या सर्व बाबींचा विचार करून, न्यासाने असा निर्णय घेतला की, प्रत्येक पंगतीच्या काही जागा राखीव ऑनलाइन महाप्रसाद बुकिंग करणाऱ्यांसाठी ठेवाव्यात आणि त्यानुसार सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून आम्ही ऑनलाइन महाप्रसाद बुकिंगची सोय सर्व भक्तांसाठी केलेली आहे.

ज्यामुळे सर्व स्वामी भक्तांचा वेळ वाचेल आणि त्यांना त्यांच्या वेळेचे नियोजन नेमकेपणाने करता येईल, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळ आणि महाप्रसादाची वेळ यांची सांगड योग्य रीतीने घालता येईल. अशा सर्व बाबींना गृहीत धरून न्यासाच्या वतीने  सुरू करण्यात येणाऱ्या या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवेचा लाभ घ्यावेत व या योजनेची माहिती अक्कलकोटास नजीकच्या काळात येऊ इच्छिणाऱ्या स्वामी भक्तांनाही द्यावी असे भोसले यांनी सांगितले.सदरचे न्यास हे विविध उपक्रम राबविण्यामध्ये राज्यात अग्रेसर असून, स्वामी भक्तातून वेळोवेळी आलेल्या सूचनांचे पालन देखील काटेकोरपणे करण्यात येते. कोविड १९च्य पार्शवभूमीवर शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी न्यासाकडून होत आहे.----------------------------१० जणांसाठी ऑनलाईन बुकिंग : वरील सेवा पूर्णतः मोफत असेल. ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करण्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तसेच एकावेळेस जास्तीत जास्त १० जणांसाठी ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करता येईल.

---------------------ऑनलाईन महाप्रसाद बुकिंगची प्रक्रिया :1) www.swamiannacchatra.org  ह्या वेबसाईटवर जाऊन तिथे असलेल्या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग ह्या बटणला क्लिक करावेत.2) त्या नंतर पुढील ३ महिन्यासाठीच्या तारखांचे विवरण दिसेल.3) त्या कॅलेंडर वरील आपल्याला ज्या तारखेसाठी महाप्रसाद घ्यावयाचे आहे त्या तारखेवर क्लिक करावे.4) नंतर येणारा फॉर्म भरावा आणि submit करावेत.5) फॉर्म submit केल्यावर आपणास एक QR code मिळेल, तो डाऊनलोड करावा आणि तो QR code प्रवेशावेळेस प्रवेशद्वारावर दाखवावे.

टॅग्स :Solapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोटcorona virusकोरोना वायरस बातम्या