आव्हाडांचे निलंबन रद्द
By Admin | Updated: December 16, 2014 05:25 IST2014-12-16T03:48:45+5:302014-12-16T05:25:01+5:30
विधानसभा सभागृहात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून शुक्रवारी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे करण्यात आलेले निलंबन सोमवारी रद्द करण्यात आले.

आव्हाडांचे निलंबन रद्द
नागपूर : विधानसभा सभागृहात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून शुक्रवारी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे करण्यात आलेले निलंबन सोमवारी रद्द करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या संबंधीचा ठराव मांडला.
सोमवारी कामकाज सुरू होताच पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सदस्य सभागृहात आले. पवार म्हणाले, राज्यात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा निलंबनापेक्षा महत्त्वाच्या आहेत. आम्ही सभागृहाबाहेर बसणे योग्य होणार नाही. आम्ही बहिष्कार मागे घेत आहोत, असे सांगत आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली होती.