‘त्या’ दोन महिला वाहक निलंबित

By Admin | Updated: July 21, 2014 01:23 IST2014-07-21T01:23:36+5:302014-07-21T01:23:36+5:30

फिल्मी स्टाईलने मारहाण

Suspend the two women carriers | ‘त्या’ दोन महिला वाहक निलंबित

‘त्या’ दोन महिला वाहक निलंबित


मंगळवेढा : मंगळवेढा बसस्थानक आवारात फिल्मी स्टाईलने मारहाण करणाऱ्या ‘त्या’ दोन महिला वाहकांना आगारप्रमुख अनिलकुमार घेवारे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईने मंगळवेढा आगारात खळबळ माजली आहे.दरम्यान आपल्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा निलंबित महिला वाहक बबिता गावडे हीने केला आहे़
मंगळवेढा आगारातील महिला वाहक बबिता गावडे व रोहिणी कोलते यांनी शुक्रवारी (१८ जुलै) दुपारी ३ वा. ड्युटीवर असताना मंगळवेढा बसस्थानकावर प्रवाशांसमोर फिल्मी स्टाईलने अंतर्गत कलहावरून हाणामारी केली. याबाबत चौकशी अहवाल आगारप्रमुख अनिलकुमार घेवारे यांनी मागवून घेतला आणि दोघींना निलंबित केले.

Web Title: Suspend the two women carriers