शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

By राकेश कदम | Updated: June 3, 2023 19:49 IST

सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले. 

सोलापूर: सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या केबीनमध्ये घेऊन बसतात. यापुढील काळात असे होऊ नये, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसमाेर मुंबईत केली. सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले. काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आशीष दुआ, सोनल पटेल, नसीम खान, कुणाल पाटील, मोहन जोशी, उल्हास पवार आदी उपस्थित होते. 

काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवडीवरुन सुशीलकुमार शिंदे आणि जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. सोलापुरातील काँग्रेसच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांना कोपऱ्यातील खुर्ची ठेवल्यामुळे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील निघून गेले होते. या वादाचे पडसाद शनिवारी मुंबईच्या बैठकीत उमटले. नरोटे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सकारात्मक वातावरण होते. पुलवामा हल्ल्यानंतर यात बदल झाला. 

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममुळे काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपचे खासदार आणि दोन आमदारांबद्दल नाराजी आहे. या नाराजीचा पक्षाला फायदा होऊ शकतो. सोलापूर मतदारसंघाचे नेतृत्व सुशीलकुमार शिंदे यांनीच केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवार त्यांनीच ठरवावा. पण सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना इथे किंमत दिली जाते. आम्ही आमच्या मनाचे बोलत नाही. शहरात जी चर्चा आहे तेच बोलत आहे. तालुकाध्यक्ष निवडीत जे झाले ते पुन्हा व्हायला नको, असेही नरोटे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना समज द्याराष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आघाडीचा धर्म पाळला जात नाही. कॉंग्रेसमधील काही लोकांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. आम्ही राष्ट्रवादीचे लोक घेतले तर आघाडीच्या धर्माची आठवण करुन दिली अशी शहरातील काँग्रेस नेत्यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आघाडी हवी असेल तर आघाडीचा धर्म पाळायला सांगा, असे नरोटे म्हणाले. आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात नरोटे यांच्या राष्ट्रवादीबद्दल मतांना दुजारो दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस