सुसाट रेल्वे आली.. धडकून गेली अन् तरुणाचे पाय धडावेगळे झाले पंढरीतील घटना; हेडफोनवर गाणं ऐकणं पडलं महागात
By विलास जळकोटकर | Updated: March 28, 2023 18:03 IST2023-03-28T18:03:38+5:302023-03-28T18:03:52+5:30
मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

सुसाट रेल्वे आली.. धडकून गेली अन् तरुणाचे पाय धडावेगळे झाले पंढरीतील घटना; हेडफोनवर गाणं ऐकणं पडलं महागात
सोलापूर : मोबाईल कधी हाताळावा.. गाणी कधी ऐकावीत याला काही सीमाच राहिलेली नाही. अशाच प्रकारामुळे पंढरपुरात ट्रॅक ओलांडताना सुसाट आलेल्या रेल्वनं धडक दिल्यानं एका तरुणाला आला जीव गमावावा लागला. धडक इतकी जोरात होती की त्याचे दोन्ही पाय धडावेगळे झाले. मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. जयेश किशोर जाधव (वय- ३२, रा. जुना कासेगाव रोड, पंढरपूर) असे त्या मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव सांगण्यात येत आहे.
मिळालेली माहिती अशी की, यातील मृत्यू पावलेला तरुण जयेश पंढरपुरातील उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळील रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. यावेळी तो मोबाईलला हेडफोन लावून गाणे ऐकत होता असे सांगण्यात येत आहे. ही वेळ साधारण नऊच होती. नेमकी त्याचवेळी रेल्वे सुसाट वेगाने आले आणि या तरुणाच्या कानात हेडफोन असल्याने ऐकू आले नाही आणि रेल्वेनं दिलेल्या धडकेत त्याचे दोन्ही एकीकडे आणि धड एकीकडे झाले.
घटना घडताच एकच हल्लकल्लोळ उडाला. बघ्यांनी एकच गर्दी केली. तातडीने रेल्वेचे पोलीसही घटनास्थळी धावले. पुढील प्रक्रिया सुरु आहे. यानंतर अधिक माहिती समोर येईल, असे सांगण्यात आले.