शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अखेर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:59 IST

रेल्वे प्रशासनाची माहिती : भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

ठळक मुद्देसोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद -बीड-जळगाव रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मार्च २०१९ मध्ये मंजुरी दिली होतीभूसंपादनासाठीची सर्व कार्यवाही केली जात आहे. भूसंपादन, पूल व इतर कार्यासाठी इंजिनिअरिंग कन्सल्टंटची नेमणूक करण्याचे काम सुरू

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील मराठवाड्याला जोडणाºया महत्त्वपूर्ण अशा सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-जळगाव रेल्वेमार्ग लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़ सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, भूसंपादन (जमीन संपादित) करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़ याबाबत सोलापूरचे खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मध्य रेल्वे विभागात असलेल्या सोलापूर विभागातील खासदारांची रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत आॅनलाइन बैठक झाली़ या बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी, खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा़ ओमप्रकाश निंबाळकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, उपव्यवस्थापक व्ही़ के़ नागर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप हिरडे आदी खासदार उपस्थित होते.

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद -बीड-जळगाव रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मार्च २०१९ मध्ये मंजुरी दिली होती, त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते़ सोलापूरपासून शेवटच्या स्थानकापर्यंतचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे़ नकाशे, रेखांकनाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनासाठीची सर्व कार्यवाही केली जात आहे. भूसंपादन, पूल व इतर कार्यासाठी इंजिनिअरिंग कन्सल्टंटची नेमणूक करण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

नव्या गाड्या अन् थांबे वाढविण्यावर झाली चर्चारेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत खासदारांच्या झालेल्या आॅनलाइन बैठकीत सर्वच खासदारांनी नव्या गाड्या सुरू करण्यासोबत आहे त्या गाड्यांना जास्तीत जास्त रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यासंदर्भात चर्चा केली़ रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधून जास्तीत जास्त मागण्या, अडचणी, कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही मत खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी व खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेBeedबीडOsmanabadउस्मानाबादJalgaonजळगाव