शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गरज सरो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 15:13 IST

मंदार पाटील (नाव बदललेले) माझा तसा बºयापैकी जवळचा मित्र. आठ-पंधरा दिवसांत आमची भेट व्हायची, गप्पा व्हायच्या, पण गेले काही ...

मंदार पाटील (नाव बदललेले) माझा तसा बºयापैकी जवळचा मित्र. आठ-पंधरा दिवसांत आमची भेट व्हायची, गप्पा व्हायच्या, पण गेले काही आठवडे तो मला भेटला नव्हता. कामाच्या रगाड्यात मला ते फारसे लक्षातही आले नाही. अचानक एकेदिवशी तो माझ्या ओपीडीत उगवला. थोडासा कृश झालेला होता, थकल्यासारखा दिसत होता. मी त्याला काळजीने विचारले ‘अरे, काय झाले? आजारी आहेस का?’ तेव्हा तो म्हणाला ‘काही नाही रे,? अ‍ॅनिमियावरची ट्रीटमेंट चालू आहे

माझी. ‘चाळिशीच्या जवळपास अ‍ॅनिमिया? (रक्तक्षय) माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याला म्हटलं, झोप बघू जरा टेबलावर, तपासू देत मला तुला.’ काही गरज नाही रे, यापूर्वीही त्या एक्सवायझेड सर्जनने मला तपासले आहे. मला इतर कोणताही आजार नाही. अ‍ॅनिमियाच्या गोळ्या घेतो आहे मी. होईल बरा. ‘अरे, तुझ्याकडून फी घेणार नाही मी, काळजी करू नकोस.’ असे म्हटल्यावर तो हसत हसत तपासण्याच्या टेबलवर झोपला. त्याच्याशी चर्चा करताना मला असे लक्षात आले होते की, त्याच्या शौचाच्या सवयीही अशात बदललेल्या आहेत. माझ्या दृष्टीने हे चांगले लक्षण नव्हते. चाळिशीच्या जवळपास वय, नुकत्याच बदललेल्या शौचाच्या सवयी आणि रक्तक्षय म्हणजेच अ‍ॅनिमिया, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की, आम्ही सर्जन फक्त एकाच रोगाचा विचार करू शकतो, तो म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर. तपासल्यानंतर माझी शंका आणखी बळावली आणि म्हणून मी त्याला मोठ्या आतड्याची दुर्बिणीने तपासणी म्हणजेच कोलोनोस्कोपी करण्यास सांगितले.

दुर्दैवाने माझी शंका खरी ठरली, माझ्या या मित्राला मोठ्या आतड्याचा कॅन्सर निघाला. बायॉप्सी करावी लागली. पुढे पोटाचा सीटी स्कॅन करण्यासाठी मी त्याला एका मोठ्या रुग्णालयात पाठविले. परंतु मी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले नव्हते. वहिनी किंवा त्याचा मुलगा जर बरोबर आले तर त्यांना हे सांगावे, असा माझा प्लॅन होता. परंतु प्रत्येक वेळी तो एकटाच माझ्याकडे येई आणि मग मी ही गोष्ट पुढे ढकलत असे. या मोठ्या रुग्णालयात मीही कन्सल्टंट असल्याने त्याचा सीटी स्कॅन मी स्वत: पाहिला, तज्ज्ञ रेडिओलॉजिस्टबरोबर चर्चा केली. त्याच्या काही तपासण्या माझ्या हॉस्पिटलमधे केल्या. बायॉप्सीचा रिपोर्ट येण्यास साधारणपणे एक आठवडा लागतो.

दरम्यान, त्याचा अ‍ॅनिमिया म्हणजे रक्तक्षय कमी करण्यासाठी त्याला दोन रक्ताच्या बाटल्याही मी माझ्या हॉस्पिटलमध्ये चढविल्या. त्याचे फारसे बिलही घेतले नाही. त्याला आता आॅपरेशनची गरज आहे, हेही मी सांगितले. मोठ्या आतड्याचा काही भाग काढून टाकावा लागेल, हे मी त्याला सांगितले, परंतु कॅन्सरचा उल्लेख टाळून. माझ्या निदान कौशल्याचे या मित्राने खूपच कौतुक केले. इतर डॉक्टरांना जमले नाही, पण मी ते कसे अचूक केले याचे कौतुक करताना तो थकत नव्हता. मलाही अंगावर मूठभर मांस चढले.माझा मेडिकल इन्शुरन्स असल्यामुळे हे आॅपरेशन जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये केले तर मला ते कॅशलेस होईल, असे सांगून त्याने हे आॅपरेशन मोठ्या हॉस्पिटलमध्ये करण्याची मला विनंती केली.

मलाही त्यात कोणतीही अडचण नव्हती. रेफरल चीट देऊन मी त्याला त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्यास पाठविले. पण हा पठ्ठ्या तिकडे पोहोचलाच नाही. तो अ‍ॅडमिटही झाला नाही आणि मला काही निरोपही त्याच्याकडून मिळाला नाही. मला असे वाटले की, कदाचित काही दिवसांनी तो अ‍ॅडमिट होण्यास येईल आणि मग पुन्हा मी माझ्या कामाच्या ओघात ही गोष्ट विसरून गेलो. या मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझी आॅपरेशन्स चालू असतात. एकेदिवशी माझे एकाद् दुसºया रुग्णाचे आॅपरेशन सुरू करण्यापूर्वी सहज म्हणून मी आॅपरेशन थिएटरच्या लॉबीमध्ये उभा होतो आणि आॅपरेशन थिएटरमध्ये बोर्डवर रुग्णांच्या यादीमध्ये मला माझ्या मित्राचे नाव दिसले. आॅपरेशनही मी जे ठरविले होते तेच होते, परंतु सर्जन मात्र दुसरा होता. तुझे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत, तू माझे अगदी अचूक निदान केलेस, माझ्यासाठी तू देवच आहेस म्हणणारा माझा हा मित्र आॅपरेशन मात्र दुसºया देवाकडून करून घेत होता.

माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. त्या खरेतर आर्थिक नुकसानीमुळे नव्हत्या किंवा माझा इगो दुखावला गेला असल्याने नव्हत्या तर त्या होत्या आपल्या एका जवळच्या मित्राने आपल्याला डावलल्याच्या भावनेमुळे. साधारणपणे एक महिन्याने या मित्राचा मला फोन आला. मला थोडे बरे वाटले. म्हटलं, ठीक आहे. आता तरी तो मला सांगेल, त्याने असे का केले ते? पण त्याने फोन वेगळ्याच कारणासाठी केला होता. माझ्याकडे जे उपचार केले होते त्याचे त्याला बिल वाढवून पाहिजे होते, क्लेम करण्यासाठी. आता मात्र हद्द झाली. मी शांतपणे ते जमणार नाही, हे सांगून फोन बंद केला. यालाच कदाचित म्हणत असावेत गरज सरो, वैद्य मरो.-डॉ. सचिन जम्मा(लेखक लॅप्रोस्कोपी सर्जन आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल