शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अहो आश्चर्यम्; लस देण्यासाठी गेले तर कुत्रा का पाळला म्हणून विचारणा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 17:07 IST

पंढरपूर तालुक्यातील खर्डीतील घटना; सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात औषधांची टंचाई

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत अकरा तालुक्यांत ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४३१ उपकेंद्रांमार्फत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.गेल्या कित्येक दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजेच्या असलेल्या औषधांची खरेदीच झालेली नाही जिल्हा परिषदेच्या सेस फंडाच्या खरेदीला ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील बंडू पवार हे नातेवाईकास श्वानदंश लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यावर डॉक्टरांनी यांनी त्यांना लस उपलब्ध नसल्याचे सांगण्याऐवजी विनापरवाना कुत्रे पाळल्याबद्दल गुन्हा दाखल करावा लागेल, असे सांगून परत पाठविल्याची घटना सोमवारी घडली़‘कोरोना’ साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची टंचाई जाणवत आहे. औषधांच्या खरेदीची फाईल सहीसाठी लटकल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत अकरा तालुक्यांत ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४३१ उपकेंद्रांमार्फत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पण गेल्या कित्येक दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजेच्या असलेल्या औषधांची खरेदीच झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या सेस फंडाच्या खरेदीला ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवरही एक रुपयाची साहित्य खरेदी झालेली नाही. जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी ५४ लाखांचा निधी आला आहे. पण या निधीतून घेण्यात येणाºया साहित्याची खरेदी फाईलीत अडकली आहे. 

जिल्ह्यात दोन महिन्यांपासून श्वानदंश लसीचा तुटवडा आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिक लसीसाठी हेलपाटे मारीत आहेत. पण जिल्हा आरोग्य विभागाकडून औषधे व इंजेक्शन्स पुरवली जात नसल्याच्या तक्रारी डॉक्टरांनी केल्या आहेत. श्वानदंश व इतर औषधांसाठी काही ठिकाणी ग्रामपंचायतींकडून निधी घेण्यात आला आहे तर काही ठिकाणी डॉक्टरांना स्थानिक खर्चातून गरज भागविण्यास सांगण्यात आले आहे. एका डॉक्टरने तर औषधांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स पाठवितो, पण त्यातून येणाºया औषधांच्या किमतीपेक्षा डिझेलचा खर्च जास्त होत असल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. फॉर्मासिस्ट सोळंकी यांना औषधांबाबत विचारणा केल्यावर साठा संपल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

श्वानदंश लसी यापूर्वी हाफकिन इन्स्टिट्यूटकडून मागविल्या होत्या. पाच हजार लसींचा पुरवठा झाला. आता नव्याने मागणी केली आहे. औषध खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मिटेल.- डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी

औषधांसाठी सुरू आहे पाठपुरावा...जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा औषध पुरवठा करावा, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्य सभापती दिलीप चव्हाण यांनी सांगितले. ‘त्या’ ६० लाखांच्या खरेदीशी आपला संबंध नाही. पण जिल्हा माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी यांच्याकडील पदभार काढण्याच्या मागणीबाबत आपण आग्रही असून, मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी कोरोना साथीनंतर अंमलबजावणी करू, असे सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदHealthआरोग्यMedicalवैद्यकीय