सुरेश काकाणी जि़ प़ चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

By Admin | Updated: July 24, 2014 01:28 IST2014-07-24T01:28:03+5:302014-07-24T01:28:03+5:30

बदली केली

Suresh Kakani Jinnah's new Chief Executive Officer | सुरेश काकाणी जि़ प़ चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

सुरेश काकाणी जि़ प़ चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी


सोलापूर: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांच्या नियुक्तीला पाच महिने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आणि त्या प्रसूती रजेवर असताना शासनाने त्यांची बदली केली आहे़ मीरा भार्इंदर महापालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांची सोलापूर जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पद शासनाने रिक्तच ठेवले आहे़
तुकाराम कासार यांच्या बदलीनंतर शासनाने श्वेता सिंघल यांची जि़प़चे सीईओ म्हणून नियुक्ती केली होती़ त्या पहिल्या महिला सीईओ ठरल्या होत्या़ अद्याप सिंघल यांची कोणत्याही पदावर शासनाने नियुक्ती केली नाही़
काकाणी यांची एक धडाडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून ख्याती आहे़ त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या विसकटलेल्या कारभाराची घडी बसविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे़ नगरविकास खात्याचे सहसचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे़ बहुधा शुक्रवारी ते पदभार स्वीकारतील.

Web Title: Suresh Kakani Jinnah's new Chief Executive Officer