पेहेच्या सरपंचपदी सुरेखा गायकवाड, उपसरपंचपदी धनाजी गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST2021-03-01T04:25:47+5:302021-03-01T04:25:47+5:30
पंचवार्षिक निवडणुकीत विवेक कचरे आणि मारुती गायकवाड यांच्या पेहे ग्रामविकास आघाडी पॅनलने ९ पैकी पाच जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व ...

पेहेच्या सरपंचपदी सुरेखा गायकवाड, उपसरपंचपदी धनाजी गायकवाड
पंचवार्षिक निवडणुकीत विवेक कचरे आणि मारुती गायकवाड यांच्या पेहे ग्रामविकास आघाडी पॅनलने ९ पैकी पाच जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले. निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी सुरेखा गायकवाड व आशा पाटील, तर उपसरपंचपदासाठी धनाजी गायकवाड व वसंत गोपाळ यांनी अर्ज दाखल केले. सुरेखा गायकवाड यांना पाच, तर धनाजी गायकवाड यांनाही पाच मते मिळाल्यामुळे सरपंचपदी सुरेखा गायकवाड, उपसरपंचपदी धनाजी गायकवाड यांची निवड घोषित केली.
यावेळी बाजार समितीचे संचालक विवेक कचरे, शाळा कृती समितीचे मारुती गायकवाड, हनुमंत गायकवाड, भगवान बेलदार, नितीन बागल, महादेव साळुंके, बाळू शिंदे, महारुद्र गायकवाड, बबन शिखरे, अरुण गायकवाड, माउली गायकवाड, डॉ. सोमनाथ गायकवाड, पांडुरंग नायकुडे, पांडुरंग गायकवाड, पांडुरंग वाघमारे, संतोष शिंदे, विजय मोकळे, सत्यवान सदगर, शेखर बेलदर, हनुमान जगताप, पांडुरंग चव्हाण, रेखा गायकवाड, वाघमारे, शंकर शिंदे, बालाजी गायगोपाळ, लखन गायगोपाळ, हरी गायगोपाळ, सचिन जाधव, सुधीर साळुंके, रामेश्वर सुतार, किशोर गायकवाड, ग्रामसेवक सोमनाथ हाडपे आदी उपस्थित होते.