शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मृत कोरोना योध्या संदर्भात पाठविलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:21 IST

जनहित याचिकेमध्ये रूपांतर; सोलापूरचे वकील ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी पाठवले होते पत्र

सोलापूर: कोरोना लढ्यात प्राण गमावलेल्या लढ्यात आपल्या जीवाची आहुती देणाऱ्या डॉक्टर, पोलिस, परिचारिका, कर्मचारी, सफाई कामगार यांना शहीद म्हणून जाहीर करा, असे ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी पाठवलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांनी दखल घेतली आहे. पत्राचे जनहित याचिकामध्ये रूपांतर झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे आजार देशात फोफावत असताना,  देशात रुग्ण वाढत आहेत व कोरोनासारखा अदृश्य जीव घेणी रोगा सोबतच्या लढ्यात आपले डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी व पोलिस अधिकारी व कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून, जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करीत आहेत. अशातच कोरोनाशी दोन हात करताना आपले डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी व पोलिस यांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे, परंतु दुदैवी बाब अशी की ह्या आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या कोरोना वीरांचे बातमी ही कोरोनामुळे 'दगावले' अशी होत आहे. परंतु ज्या अर्थी आपल्या प्राणाची व कुटुंबाची पर्वा ही न करता हे कोरोना वीर आपल्या जीवाची आहुती देत आहेत त्या अर्थी त्यांना 'दगावले' असे न म्हणता 'शहिद' झाले असे संबोधावे व त्या कोरोना वीरांना 'शहीद ' चा दर्जा देण्यात यावा, त्यांचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात व्हावे व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना वीरांचे पूर्ण वेळ पगार द्यावे व युध्दात शहीद होणाऱ्या जवानांना जी सवलत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिली जाते तशी सवलत ह्या कोरोना वीरांना द्यावी असे निर्देशन केंद्र शासनास दयावे. अशी विनंती वजा पत्र मंजुनाथ कक्कळमेली यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याकडे केली होती.

या पत्रात चीन सरकारने आपल्या एका डॉक्टरला 'मरणोत्तर हुतात्मा' म्हणून जाहीर केल्याचे व २१.०४.२०२० रोजी ओडिशा सरकारने कोरोनाही लढणाऱ्या योद्धा बाबत जाहीर केल्या असल्याचे ही नमूद केले आहे.

तसेच भारतात 'शहीद' कोणाला संबोधावे या संदर्भात कुठलाच कायदा आजवर अस्तित्वात नाही, त्यावर सुद्धा उपाययोजना करणे संबधी केंद्र सरकारला निर्देशन द्यावे असे सुद्धा या पत्रात नमूद केले आहे.

जनहित याचिकेवर लवकरच सुनावणीहोईल: ॲड. मंजुनाथ कक्कळमेलीकोरोनाच्या लढ्यात डॉक्टर, हॉस्पिटलचे कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. बऱयाच जणांना यामध्ये आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. हा प्रकार आद्यप सुरूच आहे त्यामुळे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना मे २०२० मध्ये पत्र पाठवले होते. पत्राची दखल घेत न्यायमूर्तींनी याची नोंद करून घेतली आहे. विनंती पत्र इयत्ता एक जनहित याचिका झाले असून यावर पुढील सुनावणी होईल अशी माहिती ॲड.मंजुनाथ कक्कळमेली यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय