शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

Sunday Motivation; काठावर पास होणारे धानय्या कौटगीमठ २५ ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:26 IST

जगन्नाथ हुक्केरी ।  सोलापूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तोळणूर गाव. हॉटेल व्यावसायिक, पण अशिक्षित कुटुंबात जन्म. शिक्षणाचा फारसा वारसा नसताना ...

ठळक मुद्देअशिक्षित कुटुंब।  लिमकासह नऊ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुकसाठी मानांकन २५ राज्यांच्या सेट, तीन नेट आणि तीन टीईटी परीक्षेत यश मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड तोळणूर येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा, सिद्धेश्वर प्रशालेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे धडे

जगन्नाथ हुक्केरी । सोलापूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तोळणूर गाव. हॉटेल व्यावसायिक, पण अशिक्षित कुटुंबात जन्म. शिक्षणाचा फारसा वारसा नसताना आणि इंग्रजीला दहावीत ३६ तर बारावीत ३७ गुण. असे असतानाही ध्यास घेऊन २५ राज्यांच्या सेट, तीन नेट आणि तीन टीईटी परीक्षेत यश मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड केले, ते धानय्या गुरुलिंगय्या कौटगीमठ यांनी.

तोळणूर येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा, सिद्धेश्वर प्रशालेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे धडे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण अक्कलकोटच्या सी. बी. खेडगी महाविद्यालयात तर बी. एड. अकलूज येथे केल्यानंतर २००८ साली अक्कलकोटच्या मंगरुळे प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले. दहावी व बारावीला कमी गुण मिळाल्याचे शल्य नसले तरीही यातील कसूर भरून काढण्याच्या नादात धानय्या कौटगीमठ यांनी सेट, नेट परीक्षेची तयारी सुरू केली.

विद्यार्थ्यांना शिकवत ते शिकत गेले. पहिल्यांदा त्यांना यशाने हुलकावणी दिली. नोकरी करून उरलेल्या वेळेत आठ ते बारा तास अभ्यास करून यश खेचून आणलेच. पण ते यश असे तसे नव्हते तर जगाने त्याची कदर केली आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाले. लंडनच्या विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली. कामगिरीवर आयत्या मिळालेल्या डॉक्टरेटवर समाधान न मानता पुन्हा ते सोलापूर विद्यापीठातून पीएच. डी. करीत आहेत.

पहिल्यांदा केरळ राज्यातून ते सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर सर्व राज्यांतून ही परीक्षा देण्याची जिद्द बाळगून जम्मू-काश्मीरमधूनही ते परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम तर पूर्वोत्तर भारतातील सात राज्यांची मिळून गुवाहाटी विद्यापीठ परीक्षा घेते. त्यात ते दोनवेळा परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आहेत.

स्पर्धा परीक्षा देणाºयांना मार्गदर्शन एवढी पदवी घेऊन नोकरी करीत आता बस्स झाले असे न म्हणता, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळसह इतर राज्यांतील स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत आहेत. सेट, नेट व टीईटीसाठी नऊ पुस्तकांचे लेखन केले असून, चार पुस्तक प्रकाशित आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाexamपरीक्षा