तरंगफळच्या उपसरपंचपदी सुलोचना वाघमोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST2021-02-11T04:23:56+5:302021-02-11T04:23:56+5:30

विद्यमान उपसरपंच अविनाश तरंगे यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच माऊली कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची सभा झाली. यावेळी उपसरपंचपदासाठी सुलोचना वाघमोडे ...

Sulochana Waghmode as the Deputy Panch of Tarangphal | तरंगफळच्या उपसरपंचपदी सुलोचना वाघमोडे

तरंगफळच्या उपसरपंचपदी सुलोचना वाघमोडे

विद्यमान उपसरपंच अविनाश तरंगे यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच माऊली कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची सभा झाली. यावेळी उपसरपंचपदासाठी सुलोचना वाघमोडे यांचाच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी माजी सरपंच सुरेश तरंगे, तानाजी वाघमोडे, अविनाश तरंगे, सर्जेराव पिंगळे, सुब्राव वाघमोडे, भगवान तरंगे, शिवाजी वाघमोडे, रावसाहेब वाघमोडे, पोलीस पाटील जयसिंग साळवे, लालासाहेब साळवे, नानासाहेब कांबळे, सावळा कांबळे, महावीर कांबळे, नाना तोरणे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. मावळते उपसरपंच अविनाश तरंगे यांनी नूतन उपसरपंच सुलोचना वाघमोडे यांचा सत्कार केला. सहायक म्हणून ग्रामसेवक संतोष पानसरे यांनी काम पाहिले.

फोटो लाईन ::::::::::::::::::::::::::

तरंगफळच्या उपसरपंचपदी सुलोचना वाघमोडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना सरपंच माऊली कांबळे, सुरेश तरंगे, तानाजी वाघमोडे आदी.

Web Title: Sulochana Waghmode as the Deputy Panch of Tarangphal