सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सुलाखे हायस्कूलची बाजी; करळे, वायकुळे, देवकते यांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:08+5:302021-09-11T04:24:08+5:30
ही परीक्षा केंद्रीय पातळीवरील (C.B.S.E.) अभ्यासक्रमावर आधारित असते. यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित व सायबर या विषयांवर आधारित राष्ट्रीय व ...

सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सुलाखे हायस्कूलची बाजी; करळे, वायकुळे, देवकते यांना सुवर्णपदक
ही परीक्षा केंद्रीय पातळीवरील (C.B.S.E.) अभ्यासक्रमावर आधारित असते. यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित व सायबर या विषयांवर आधारित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेतल्या जातात.
२०२०-२१ यावर्षी सुलाखे हायस्कूलमार्फत बसलेल्या विद्यार्थ्यांमधून इंग्रजी विषयामध्ये सम्राट संजय करळे याने आंतरराष्ट्रीय पातळीवर १७ व्या क्रमांकावर व ‘झोन’मध्ये पाचव्या स्थानावर यश संपादित केले. सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत वेदांत सचिन वायकुळे याने प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला. ऑलिम्पियाडमध्ये साईराज नागनाथ देवकते याने प्रथम क्रमांक मिळवला. इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये सुलाखे हायस्कूल केंद्रातून प्रविष्ट झालेल्या लातूरच्या केशवराज माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पुषन कुलकर्णी याने दुसरा क्रमांक मिळवला. सर्वांना सुवर्णपदक प्राप्त झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान शिक्षक विवेक देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंद सुलाखे, संस्थेचे सचिव अनंत कवठाळे, संचालक प्रसन्न देशपांडे, प्रशालेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब पाटकूलकर, उपमुख्याध्यापक अशोक हिरोळीकर, पर्यवेक्षक अ.प. जोशी आणि रा.द. इंगळे यांनी कौतुक केले आहे.
010921\0155img-20210828-wa0014.jpg
बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघाला ग्रामीण प्रीमियर लीग टी 20 चे विजेतेपद