निंबोणीत युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:47+5:302021-06-04T04:17:47+5:30
मंगळवेढा : व्यवसाय चालत नसल्याने आणि लग्न जमत नसल्याने एका युवकाने स्वतःच्या दुकानामध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या ...

निंबोणीत युवकाची आत्महत्या
मंगळवेढा : व्यवसाय चालत नसल्याने आणि लग्न जमत नसल्याने एका युवकाने स्वतःच्या दुकानामध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दिगंबर बाळू घोगरे (२५, रा. निंबोणी, तालुका मंगळवेढा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून मंगळवारी सायंकाळी ८ च्या सुमारास निंबोणीत हा प्रकार घडला. साळूबाई बाळू घोगरे (वय ५०, रा. निंबोणी, तालुका मावळ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, दिगंबर घोगरे याने गावामध्ये ल्युमिनियम व ग्लास वर्क व्यवसाय थाटला होता. व्यवसाय नसल्याने दुकानात पत्र्याच्या अँगलला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. नातेवाइकांनी तत्काळ सोडवून मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.