विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: May 7, 2014 00:56 IST2014-05-06T20:44:09+5:302014-05-07T00:56:16+5:30

सांगोला : अज्ञात कारणावरून विवाहित महिलेने राहत्या घरी नायलॉन दोरीच्या साहाय्याने घराच्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ६ वा. घडली. उषा राजेंद्र इंगवले (वय ३९, रा. मेडशिंगी, ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

Suicide by taking a felon from marriage | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सांगोला : अज्ञात कारणावरून विवाहित महिलेने राहत्या घरी नायलॉन दोरीच्या साहाय्याने घराच्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ६ वा. घडली. उषा राजेंद्र इंगवले (वय ३९, रा. मेडशिंगी, ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
उषा इंगवले या विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून मंगळवारी सकाळी गळफास घेतला. तिला जखमी अवस्थेत उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या घटनेची वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास नागणे याने सांगोला पोलिसांत खबर दिली. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सविता कलटवाड करीत आहेत.

Web Title: Suicide by taking a felon from marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.