तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:00+5:302021-07-18T04:17:00+5:30
पोलीस सूत्रांनुसार मयत यल्लप्पा भोगप्पा पुजारी (वय २६) याने १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी तुकाराम जमादार यांच्या शेतातील ...

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पोलीस सूत्रांनुसार मयत यल्लप्पा भोगप्पा पुजारी (वय २६) याने १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी तुकाराम जमादार यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मयताचे वडील भोगप्पा यांनी शेतात गेल्यावर दिसून आली. अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टर यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत मयताचे वडील भोगप्पा यांनी खबर दिली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पो.कॉ. संजय पांढरे हे करीत आहेत.
---
ग्रामस्थांत हळहळ
मयत यल्लप्पा पुजारी याचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पुजारी हे कुटुंब काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करून आपली उपजीविका भागवत होते. स्वतःची शेती नसल्याने दुसऱ्यांची शेती बटाईने करीत होते. त्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत एकच चर्चा होत आहे.
----