शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात बांधकाम विभागातील कर्मचाºयांची गळफास घेऊन आत्महत्या, सोलापूर शहरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:03 PM

शहरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहातील पहिल्या मजल्यावरील जास्वंदी कक्ष (क्रमांक १४) मध्ये भानुदास सोपान शिंदे (वय ५९,रा. जुळे सोलापूर ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी यमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 

ठळक मुद्देयमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्था चालक अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरे, मधुकर गवळी, मुख्याध्यापिका अलका गवळी, सावळा शिंदे, शंकर जाधव, नागनाथ बनसोडे, पांडुरंग कांबळे व विलास इरकशेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल सार्वजनिक बांधकाम विभागात मयत भानुदास शिंदे कामाला होते

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर  : शहरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहातील पहिल्या मजल्यावरील जास्वंदी कक्ष (क्रमांक १४) मध्ये भानुदास सोपान शिंदे (वय ५९,रा. जुळे सोलापूर ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी यमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. फिर्यादी युवराज शिंदे यांनी  सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आश्रमशाळेच्या पदाधिकाºयांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबात मयत भानुदास शिंदे यांनी आवाज उठविल्याने तो राग मनात धरून भानुदास यांच्या पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. फिर्यादीची आई निशा शिंदे या १९९९ पासून संस्थेत स्वयंपाकी या पदावर त्यांची नेमणूक होती. सार्वजनिक बांधकाम विभागात मयत भानुदास कामाला होते. ते २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले.तसेच ते संस्थेत संचालक होते.  शाळेकडून फिर्यादीच्या आईचा पगारही थांबवला. त्याकरिता मयत भानुदास आणि त्यांची पत्नी या दोघांनी झालेल्या अन्यायाविरुद्ध जिल्हा परिषद व मंत्रालय पातळीवर येथील समाजकल्याण विभागात जाऊन न्याय मागत होते. १५ ते १६ वर्षे नोकरी करून फिर्यादीच्या आईस संस्थेने न्याय दिला नाही. पगाराकरिता कोणताही पाठपुरावा केलेला नसल्याने त्यांचे कुटुंबीय हे आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे मयत भानुदास हे नेहमी मानसिक तणावाखाली राहत असे.फिर्यादीचे वडील रात्री घरी न आल्याने भाऊ धनराज हे शासकीय विश्रामगृहात जाऊन धनंजय पाटील यांच्याकडे चौकशी केली असता, भानुदास मुक्कामाकरिता विश्रामगृहात आल्याचे त्यांना समजले. त्यांनी विश्रामगृहाच्या जास्वंदी बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर कक्ष (क्रमांक १४) मध्ये जाऊन पाहणी केली असता,तेथे भानुदास यांनी गळफास घेतला होता. त्यांच्या शर्टाच्या खिशात एक सुसाईड नोट मिळून आली.  त्यानुसार संस्था चालक अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरे, मधुकर गवळी, मुख्याध्यापिका अलका गवळी, सावळा शिंदे, शंकर जाधव, नागनाथ बनसोडे, पांडुरंग कांबळे व विलास इरकशेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस