उसाच्या ट्रॉलीस रिप्लेक्टर नसल्याने कारच्या धडकेत चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:31+5:302021-02-05T06:46:31+5:30
नितीन गायकवाड हे एमएच-४६ झेड-२०५९ या क्रमांकाच्या चारचाकी गाडीतून मंगळवारी रात्री टेंभुर्णीहून मालेगावकडे निघाले होते. टेंभुर्णी- अकलूज ...

उसाच्या ट्रॉलीस रिप्लेक्टर नसल्याने कारच्या धडकेत चालक ठार
नितीन गायकवाड हे एमएच-४६ झेड-२०५९ या क्रमांकाच्या चारचाकी गाडीतून मंगळवारी रात्री टेंभुर्णीहून मालेगावकडे निघाले होते. टेंभुर्णी- अकलूज रोडवरील खुळेवस्तीजवळ ऊस भरून निघालेला ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्याने रस्त्यावरच उभा होता. ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीस रिप्लेक्टर नसल्याने तो नितीन गायकवाड यांना दिसला नाही. त्यामुळे ट्रॉली अचानक दिसल्याने गायकवाड यांनी कारचा ब्रेक लावून थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु सुमारे २५ फूट कार घसरत जाऊन उसाने भरलेल्या ट्राॅलीस धडकली. तेव्हा स्टिअरिंगचा छातीवर दाब पडून छातीच्या बरगड्या फुप्फुसात घुसल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नितीन गायकवाड हे कॉम्प्युटर व डिजिटल क्षेत्रात काम करीत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व मुलगी, असा परिवार आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
कोट :::::::::::
टेंभूर्णी पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीचालकांबरोबरच रिफ्लेक्टर नसलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांवरही कारवाई करावी. यामुळे अशा अपघातास आळा बसेल.
-संजय कोकाटे,
शिवसेना नेते
फोटो
०३नितीन गायकवाड-अपघात
०३टेंभुर्णी-अपघात