शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ऊस गाळपात कोल्हापूरला अहमदनगरने मागे टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:05 IST

सोलापूर जिल्हा मात्र पहिल्या क्रमांकावरच

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात प्रथम क्रमांकावर ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला अहमदनगर जिल्ह्याने मागे टाकलेसोलापूरचे गाळप अवघे ३६ लाख मे. टन इतकेच

अरुण बारसकरसोलापूर: यंदा ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला अहमदनगर जिल्ह्याने मागे टाकले असून, आजही तीन साखर कारखाने सुरू असताना एक कोटी ३६ लाख ९० हजार ४८ मे. टन गाळप झाले आहे. सोलापूर जिल्हा मात्र पहिल्या क्रमांकावरच आहे.राज्यात यावर्षी साखर हंगाम सुरू केलेल्या १८७ कारखान्यांपैकी सोमवारपर्यंत १८१ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तीन, पुणे जिल्ह्यातील दोन व औरंगाबाद विभागातील एका कारखाना सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

यावर्षी सोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात प्रथम क्रमांकावर असून, मागील महिन्यापर्यंत दुसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा होता. कोल्हापूर जिल्ह्यातील सुरू झालेले सर्वच २२ कारखाने १० एप्रिलपर्यंत बंद झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एकूण गाळप एक कोटी ३३ लाख ६३ हजार ८९६ मे. टन झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातीलही २२ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी १९ कारखाने बंद झाले असून, उर्वरित तीन कारखाने सुरू आहेत. 

या कारखान्यांनी सोमवारपर्यंत एक कोटी ३६ लाख ९० हजार ४८ मे. टन गाळप केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याचा हा परिणाम असून, गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला मागे टाकले आहे. सोलापूर जिल्हा मात्र राज्यात प्रथम क्रमांकावरच असून, सोलापूर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी एक कोटी ६९ लाख ३५ हजार ४९६ मे. टन ऊस गाळप केले असून, एक कोटी ७९ लाख १७ हजार ७३३ क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याने सोलापूरचे गाळप अवघे ३६ लाख मे. टन इतकेच झाले होते.

चार कारखान्यांचा उतारा कमीच...- सोलापूर जिल्ह्यातील गाळप घेतलेल्या ३० कारखान्यांपैकी २६ कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा अधिक असून, सिद्धेश्वर, सिद्धनाथ, भैरवनाथ विहाळ व भैरवनाथ लवंगी या कारखान्यांचा अंतिम साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या उताºयाचा परिणाम पुढील वर्षी एफ.आर.पी.प्रमाणे शेतकºयांना दर देण्यावर होणार आहे. गाळपात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे ऊसाचा दरावर परिणाम होणार आहे.

यंदा दुपटीहून अधिक गाळप- राज्याचे गाळप ९ कोटी ५१ लाख ५३ हजार इतके झाले असून, १० कोटी ७० लाख ८० हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी दुपटीहून अधिक गाळप झाले आहे. साखरही त्याच पटीत तयार झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने