शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचं त्रांगडं यंदाही कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:51 IST

गाळप केव्हा होईल, शेतकºयांना चिंता: सुरू होणाºया कारखान्यांची संख्या कमी; शेतकºयांना मात्र दर वाढवून हवाय

ठळक मुद्देजिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ३९ असलीतरी प्रत्यक्षात १५ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरुज्या शेतकºयांच्या उसाची लागण नोंद संपत आली तरी ऊस जाईना म्हणून तुरे येऊन वजन घटणे, उंदीर, घुशींचं संकट ओढावू लागलंयंदा ऊस क्षेत्र कमी असल्याने लवकर ऊस जाईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या ऊस उत्पादकांमधून यंदाही भ्रमनिरास

सोलापूर: सोलापूर जिल्हा तसा साखरपट्टा म्हणून सबंध महाराष्टÑामध्ये ओळखला जातो. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ३९ असलीतरी प्रत्यक्षात १५ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. सुरु झालेले कारखानेही पूर्ण क्षमतेने अद्याप सुरु नाहीत. याचे कारण म्हणजे अपुरी तोडणी वाहतूक यंत्रणा व ऊस क्षेत्राचा न आलेला अंदाज. यामुळे ज्या शेतकºयांच्या उसाची लागण नोंद संपत आली तरी ऊस जाईना म्हणून तुरे येऊन वजन घटणे, उंदीर, घुशींचं संकट ओढावू लागलं आहे. यंदा ऊस क्षेत्र कमी असल्याने लवकर ऊस जाईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या ऊस उत्पादकांमधून यंदाही भ्रमनिरास झाल्याचा सूर उमटू लागला आहे. 

तोकडी यंत्रणा; ऊस वेळेवर जाईनाअक्कलकोट तालुक्याच्या कार्यक्षेत्रात चारपैकी दोन कारखाने सुरू आहेत. यावर्षी तोकडी यंत्रणा असल्यामुळे वेळेवर ऊस गाळपासाठी जाताना दिसत नाही. परिणामी शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कार्यक्षेत्रात ११ हजार हेक्टर ऊस असल्याची नोंद कागदोपत्री असली तरी उसाची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. यामुळे उत्पन्न पन्नास टक्क्याने घटले आहे.

अक्कलकोट तालुक्याच्या कार्यक्षेत्रात मातोश्री शुगर, रुद्देवाडी, गोकुळ माऊली, तडवळ, जयहिंद,आचेगाव, स्वामी समर्थ, दहिटणे असे चार साखर कारखाने आहेत. त्यापैकी स्वामी समर्थ व गोकुळ वगळता उर्वरित दोन्ही कारखाने मागील १५ ते २५ दिवसांपासून सुरू आहेत. यंदा उसाचे क्षेत्र कमी असूनसुद्धा वेळेवर ऊस उचलला जात नसल्याचे गाºहाणे ऊस उत्पादक शेतकºयांमधून मांडले जाऊ लागले आहे. याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता दरवर्षाच्या तुलनेत पन्नास टक्केसुद्धा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. याची कारणेही अनेक आहेत. 

एकंदरीत चार पैकी तालुक्यात दोनच कारखाने चालू असून केवळ ४०० वाहने कार्यरत आहेत. दोन बंद असलेल्या कारखान्यांपैकी एक शेतकरी ऊसबिलाअभावी तर एकावर प्रशासक आहे. ऊस घेऊन जाण्यासाठी उशीर होत  असल्यामुळे सर्वत्र उसाचे तुरे वाढले आहेत. यामुळे वजन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ऊस क्षेत्र घटले तरी शेतकºयांची धावपळ सुरुचमोहोळ :  गेली तीन वर्षे पावसाअभावी सातत्याने दुष्काळाच्या छायेत असणाºया मोहोळ तालुक्यातील उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे तालुक्यातील ३ साखर कारखान्यांपैकी केवळ एक कारखाना सुरू आहे. ऊस क्षेत्र घटल्यामुळे ऊसतोड लवकर होईल अशा अपेक्षेत असलेल्या शेतकºयांची धावपळ सुरुच आहे.

मोहोळ तालुक्यात केवळ उजनीच्या भरवशावर गेल्या दहा ते पंधरा वर्षांत बळीराजा रब्बी व खरीप पिकापेक्षा ऊस शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. त्यामुळे तालुक्याच्या सीमेवर चार साखर कारखाने असताना तालुक्यातील हक्काचे तीन कारखाने निर्माण झाले. तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाचे क्षेत्र घटले. चालूवर्षी उजनी पाण्यासह पावसाने पाठ फिरवल्याने बहुतांश  शेतकºयांनी ऊस लावलाच नाही. आजमितीला तालुक्यात केवळ ५ हजार ८५३ हेक्टर एवढाच ऊस शिल्लक आहे त्यामुळे  कारखान्याला नोंदवलेल्या उसाचे प्रमाण कमालीचे घटले आहे.

चालू हंगामासाठी अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यावर केवळ १ लाख ४ हजार टन उसाची नोंद झाली होती. तोडणी, वाहतूक खर्च व नोंद खूपच कमी झाल्याने कारखाना चालू करणे परवडत नाही म्हणून  कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेत नोंदविलेला ऊस विठ्ठलराव शिंदे व जयहिंद शुगर या दोन कारखान्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.

जकराया साखर  कारखान्यात ७ हजार हेक्टर उसाची नोंद आहे. दररोज ३ हजार ५०० मे.टन क्षमतेने गाळप सुरु आहे. ज्या शेतकºयांची अडचण आहे. अशा सर्वांचा ऊस गाळप करण्यास मदत करु, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.एकंदरीत चालू वर्षी उसाचे कमी झालेले प्रमाण, त्यात कारखाने बंद यामुळे अडचणीतून मार्ग काढत शेती करणाºया बळीराजाला पुन्हा अडचणीत येण्याचीच वेळ आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती