शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

साखर आयुक्तांचे पत्र ; साखर कारखान्यांना थेट साखर विक्रीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:28 IST

सोलापूर : थकलेली एफआरपीची रक्कम देण्यासाठी शिल्लक साखरेची विक्री होत नसल्याची साखर कारखान्यांची अडचण लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या किमान ...

ठळक मुद्देकिमान ३१०० प्रतिक्विंटल दराने साखर कारखान्यांना साखर विक्री करण्यास परवानगीकेंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मासिक कोट्याच्या मर्यादेतच साखर विक्री करता येणारसाखर विक्री करण्यासाठी जिल्हाधिकाºयांचे नियंत्रण राहणार

सोलापूर: थकलेली एफआरपीची रक्कम देण्यासाठी शिल्लक साखरेची विक्री होत नसल्याची साखर कारखान्यांची अडचण लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या किमान दराला अधीन राहून स्थानिक पातळीवर वसतिगृह, आश्रमशाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट तसेच कारागृहांना साखर विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. साखर आयुक्तांनी हे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.

राज्यातील वाढलेली साखर कारखान्यांची संख्या व होणारे साखर उत्पादन लक्षात घेता अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादित होणारी साखर विक्री होत नसल्याची कारखानदारांची तक्रार आहे. एकीकडे बाजारात साखरेचे दर खाली येतात अन् दुसरीकडे ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे पैसे देणे अशक्य होत आहे. यामुळे अनेक  साखर कारखाने गाळपाला आणलेल्या उसाचे एफआरपीनुसार पैसे देत नाहीत. यामुळे राज्य शासनाच्या प्रस्तावानुसार केंद्राने साखरेचा   दर  प्रतिक्विंटल २९०० रुपयांवरुन ३१०० इतका केला आहे. या दरानेही साखर विक्री होत नसल्याची कारखानदारांची ओरड असल्याने राज्य शासनाने साखर कारखान्यांना साखरेची थेट विक्री करण्यास परवानगी दिली आहे.  

या आदेशानुसार शासकीय समाजकल्याण वसतिगृहे, आश्रमशाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, कारागृहे, प्रशिक्षण संस्था आदी ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या किमान ३१०० प्रतिक्विंटल दराने साखर कारखान्यांना साखर विक्री करण्यास परवानगी दिली आहे; मात्र केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मासिक कोट्याच्या मर्यादेतच साखर विक्री करता येणार आहे.  अशा पद्धतीने साखर विक्री झाली तर थकीत एफआरपी देणे कारखान्यांना सोयीचे होणार आहे. अशा पद्धतीने साखर विक्री करण्यासाठी जिल्हाधिकाºयांचे नियंत्रण राहणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय