माढा तालुक्यातील कामांची कार्यकारी अभियंत्यांकडून अचानक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST2021-07-07T04:28:00+5:302021-07-07T04:28:00+5:30

माढा तालुक्यात नुकतेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप कदम यांनी सुरू असलेली विविध विकास कामे पाहणी करण्यासाठी ...

Sudden inspection of works in Madha taluka by Executive Engineers | माढा तालुक्यातील कामांची कार्यकारी अभियंत्यांकडून अचानक पाहणी

माढा तालुक्यातील कामांची कार्यकारी अभियंत्यांकडून अचानक पाहणी

माढा तालुक्यात नुकतेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप कदम यांनी सुरू असलेली विविध विकास कामे पाहणी करण्यासाठी मानेगाव परिसरात दौरा केला. यावेळी उपअभियंता एस. जे. नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता निलेश खळदकर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता कदम यांनी मानेगाव, धानोरे, कापसेवाडी, वडाचीवाडी (अ.उ), केवड ,दारफळ, महातपूर, वडाचीवाडी (उ बू), रणदिवेवाडी या गावातील सुरू असलेली सर्व कामे पाहणी केली. त्यात त्यांनी कामाची गुणवत्ता तपासली, कुठे काय तक्रारी आहेत का हेही तपासले या गावातील काँक्रिट रस्ते, वाड्यावस्त्यांना जोडणारे सर्व रस्ते हे गुणवत्तापूर्ण झाल्याचे सांगत त्याबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

----

०६कुर्डूवाडी-रोड

मानेगाव ते वाकाव रस्त्यावरील पूल पुरामुळे वाहून गेला होता. त्याची व मुरुमीकरण रस्त्याची पाहणी करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप कदम. सोबत उपअभियंता एस. जे. नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता निलेश खळदकर, ग्रामस्थ.

----

Web Title: Sudden inspection of works in Madha taluka by Executive Engineers