गुलबर्ग्यातील रुग्णावर सोलापुरात यशस्वी किडनी प्रत्यारोपण
By Admin | Updated: November 18, 2016 16:20 IST2016-11-18T16:20:52+5:302016-11-18T16:20:52+5:30
कर्नाटकच्या गुलबर्गा येथील एका 28 वर्षांच्या तरुणावर किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

गुलबर्ग्यातील रुग्णावर सोलापुरात यशस्वी किडनी प्रत्यारोपण
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 18 - कर्नाटकच्या गुलबर्गा येथील एका 28 वर्षांच्या तरुणावर किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. अश्विनी ग्रामीण मेडिकल कॉलेज रुग्णालयात ही पहिली यशस्वी ब्रेन डेड रुग्णाची किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली आहे.
दरम्यान, गुरूवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता दोन्ही रूग्णांची किडनी मॅच झाल्याने किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पूर्वपरवानगीने शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजून 30 मिनिटांनी पुण्याहुन ब्रेन डेड घेऊन निघालेली गाडी सोलापूर येथील अश्विनी रूग्णालयात पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी पोहोचली.
त्यानंतर ठिक 6 वाजता शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये रूग्णास नेण्यात आले़. किडनीचे यशस्वी प्रत्यारोपन करून अश्विनी हॉस्पिटलची टीम सकाळी ठिक 9 वाजता बाहेर आली. डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. मयुर मस्तुद, डॉ. संदीप होळकर यांच्यासह डॉ. सेजल सुतरकल व डॉ. मिनाक्षी निमजे या सर्वांनी मिळून ही यशस्वी प्रक्रिया पार पाडली आहे.